शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

साक्षी मलिक : बस कंडक्टरच्या मुलीची ऑलिम्पिक पदकानंतर आणि आता लग्नानंतरही कुस्तीत घोडदौड सुरूच

By admin | Updated: May 12, 2017 17:48 IST

वडिलांना नाकारलं होतं प्रमोशन. ऑलिम्पिक पदक मिळविण्यापूर्वी होती साधी क्लार्क. साक्षी मलिकचा प्रवास. जाणून घ्या तिच्या आयुष्यातील 13 खास गोष्टी

 - मयूर पठाडे

 
रिओ ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक विजेत्या साक्षी मलिकनं आपलं विजयी अभियान कायम राखताना सध्या दिल्लीमध्ये सुरू असलेल्या आशियाई स्पर्धेतही 58 किलो गटात  आपलं पदक निश्चित केलं आहे. बस कंडक्टरच्या या मुलीनं लग्नानंतरही देशाचा झेंडा उंचावत नेला आहे. 
2016च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकून साक्षीनं इतिहास घडवताना कुस्तीत ऑलिम्पिकमध्ये पदक मिळविणारी पहिली भारतीय महिला म्हणून देशाचं नाव उंचावलं होतं. 
रिओ ऑलिम्पिकनंतर गेल्याच महिन्यात 2 एप्रिल 2017 रोजी साक्षीनं हरयाणाचाच प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय मल्ल सत्यव्रत कादियनबरोबर विवाह केला होता. 
ऑलिम्पिक आणि विवाहानंतरची ही तिची पहिलीच आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे. आपल्यातली जिद्द पुन्हा एकदा दाखवून देताना तिनं पदकाची निश्चिती केली आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिच्याच मैत्रिणी विनिश फोगाट (55 किलो) आणि दिव्या काकरान (69 किलो) यांनीही आपलं किमान रौप्य पदक निश्चित केलं आहे. 
साक्षीचं नाव आज जगभर झालं असलं तरी तिचा हा प्रवास सोपा नक्कीच नव्हता.
 
कसा झाला साक्षीचा प्रवास?
 
 
1- अत्यंत सर्वसामान्य घरात साक्षीचा जन्म झाला. साक्षीचे वडील सुखबीर मलिक हे बस कंडक्टर तर साक्षीची आई सुदेश मलिक एका लोकल हेल्थ क्लिनिकमध्ये सुपरवायझर होती. अगदी साक्षीला ऑलिम्पिकचे पदक मिळेपर्यंत साक्षीचे वडील दिल्ली ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनमध्ये (डीटीसी) बस कंडक्टर होते. 
 
2- साक्षीला ऑलिम्पिक पदक मिळाल्यानंतर दिल्ली सरकारनं साक्षीला एक कोटी रुपये बक्षीस म्हणून देताना साक्षीचे वडील सुखबीर मलिक यांनाही प्रमोशन देण्याचा निर्णय घेतला. 
 
3- दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या उपस्थितीत कॅबिनेटच्या मिटिंगमध्ये हा निर्णय घेण्यात आला होता, तथापि सुखबीर मलिक यांच्या कॉन्फिडेन्शिअल रिपोर्टमध्ये काही किरकोळ ताशेरे असल्यामुळे दिल्ली ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशननं (डीटीसी) सुखबीर यादव यांना प्रमोशन देण्यास नकार दिला होता. 
 
 
4- हरयाणाच्या रोहतक जिल्ह्यातील मोखरा या छोट्याशा खेड्यात साक्षीनं कुस्तीचे धडे गिरवले. 
 
5- तिचे आजोबा बदलूराम हेदेखील एकेकाळचे नावाजलेले मल्ल होते. त्यांच्याकडे पाहात साक्षीही मोठी झाली आणि कुस्तीची जिगर तिच्यात भिनत गेली. 
 
6- असं असलं तरी साक्षीनं कुस्तीला सुरुवात तशी उशिरा केली. वयाच्या बाराव्या वर्षी तिनं कुस्तीला सुरुवात केली, पण बघता बघता तिचा प्रवास ऑलिम्पिक पदकापर्यंत गेला. अजूनही हा प्रवास संपलेला नाही.
 
7- साक्षीनं हरयाणातल्या रोहतक जिल्ह्यातील महर्षी दयानंद युनिव्हर्सिटीमधून फिजिकल एज्युकेशनमध्ये मास्टर्सची डिग्री घेतली आहे. 
 
 
8- साक्षी रेल्वेच्या दिल्ली डिव्हिजनमध्ये नोकरीला होती. ऑलिम्पिक पदक मिळेपर्यंत ती तिथे साध्या क्लर्कपदावर होती. त्यानंतर तिला गॅझेटेड ऑफिसर म्हणून बढती देण्यात आली होती.
 
9- आपल्या हक्कांची लढाई लढताना रोहतक येथील महर्षी दयानंद यनिव्हर्सिटीत साक्षी मलिकला ‘खेल निर्देशक’ पदावर नोकरी देण्यात आली. 
 
10- फोर्ब्सने साक्षीचा बहुमान करताना आशियातील ‘अंडर थर्टी’तील सफल आणि लोकमान्य लोकांच्या यादीत तिचा समावेश केला. 
 
11 - रोहतकचाच प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय मल्ल सत्यव्रत कादियनसोबत साक्षी गेल्याच महिन्यात रोहतक येथे दि. 2 एप्रिल 2017 रोजी विवाहबद्ध झाली. सत्यव्रतनंही ज्यनिअर वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये कुस्तीत ब्रांझ पदक पटकावलेलं आहे. 
 
12- लग्नानंतर आठव्याच दिवशी 58 किलो वजनी गटात साक्षी मलिक वर्ल्ड रॅँकिंगमध्ये पहिल्या स्थानावर पोहोचली. 
 
13 साक्षी मलिकला पद्मर्शी आणि खेलर} या सर्वोच्च पुरस्कारानं बहुमानित करण्यात आलं आहे.