शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

"माझ्या मुलीने देशासाठी पदकं जिंकली आहेत, त्यानं काय केलंय?"; सिद्धार्थच्या ट्विटवरून सायना नेहवालच्या वडिलांची संतप्त प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2022 09:33 IST

Actor Siddharth Tweet Saina Nehwal : माझ्या मुलीने देशासाठी पदकं जिंकली आहेत, त्याचे देशासाठी काय योगदान आहे? असा प्रश्न हरवीर सिंह नेहवाल यांनी विचारला आहे.

नवी दिल्ली : साऊथचा अभिनेता सिद्धार्थ आपल्या वादग्रस्त ट्विटमुळे चर्चेत आला आहे. भारताची बॅडमिंटनपटू सायना नेहवालबाबत केलेल्या एका ट्विटवरून तो आता वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. यावरुन संताप व्यक्त केला जात असून महिला आयागानेही याची दखल घेत सिद्धार्थला नोटीस पाठवली आहे. यातच आता सायना नेहवालचे वडील हरवीर सिंह नेहवाल यांनी सुद्धा टाइम्स नाऊशी संवाद साधताना संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. माझ्या मुलीने देशासाठी पदकं जिंकली आहेत, त्याचे देशासाठी काय योगदान आहे? असा प्रश्न हरवीर सिंह नेहवाल यांनी विचारला आहे.

"माझ्या मुलीसाठी अशा प्रकारचे शब्द वापरल्याने मला खूप वाईट वाटलं. त्याने देशासाठी काय केले आहे? तिने देशासाठी पदकं जिंकली आहेत, देशाला गौरव मिळवून दिला आहे, भारत एक महान समाज आहे, असे मी नेहमीच मानत आलो आहे. सायनाला पत्रकार आणि क्रीडा बंधूंचा पाठिंबा आहे कारण एका खेळाडूला किती संघर्ष करावा लागतो हे त्यांना माहीत आहे", असे हरवीर सिंह नेहवाल यांनी म्हटले आहे.

दरम्यान, सायना नेहवालने नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल एक ट्विट केले होते. त्यामध्ये तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्यादरम्यान झालेल्या सुरक्षेतील त्रुटीवरून चिंता व्यक्त केली होती. जर आपल्या पंतप्रधानांच्या सुरक्षेवरच प्रश्न उपस्थित होत असतील, तर तो देश स्वत:ला सुरक्षित म्हणू शकत नाही. पंजाबमध्ये जे काही घडले, त्याची मी कठोर शब्दांत निंदा करते, असे ट्विट तिने केले होते. सायना नेहवालच्या ट्विटवर अभिनेता सिद्धार्थने ट्विट केले होते. यामध्ये त्याने द्विअर्थी शब्दांचा वापर करत पुढे शेम ऑन यू रिहाना असे लिहिले होते. लोकांनीही त्याच्या या ट्वीटवर आक्षेप घेतला. तसेच महिला आयोगानेही यासंदर्भात तक्रार केली. वादानंतर सिद्धार्थने स्पष्टीकरण देत आपल्या शब्दांचा चुकीचा अर्थ घेतल्याचे तो म्हणाला होता. कोणाचाही अपमान करण्याचा प्रयत्न केला नसल्याचेही त्याने म्हटले होते.

महिला आयोगाची कारवाई  या प्रकरणानंतर महिला आयोगाकडून सिद्धार्थला नोटीस पाठवण्यात आली आहे. तसेच आयटी अॅक्ट अंतर्गत त्याच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यासही सांगण्यात आले आहे. महिला आयोगानं ट्विटरला हे ट्वीट हटवण्यासंदर्भातही कारवाई करण्यास सांगितले आहे. याशिवाय महिला आयोगाने मुंबई पोलीस आणि ट्विटरकडून यासंदर्भात अहवाल मागवला आहे. आयोग याप्रकरणी कारवाई करत असल्याची माहिती महिला आय़ोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी ट्विटरद्वारे दिली. सिद्धार्थने यापूर्वी रंग दे बसंती या चित्रपटातही भूमिका साकारली होती. यापूर्वी त्याच्या वक्तव्य, ट्विटवरून वाद निर्माण झाला होता.

टॅग्स :Saina Nehwalसायना नेहवाल