शहरं
Join us  
Trending Stories
1
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
2
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
3
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
4
देशमुख-मुंडे हत्या: "...पण, महाराष्ट्र सरकार त्यांना न्याय देत नाहीये"; सुप्रिया सुळेंची अमित शाहांकडे मोठी मागणी
5
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
6
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
7
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
8
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
9
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
10
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
11
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
12
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
13
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
14
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
15
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
16
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
17
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र
18
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
19
Jasprit Bumrah Miss Oval Test : जे आधी ठरलंय तसेच होणार! मग बुमराहची जागा कोण घेणार?
20
प्रा. ममता पाठक यांना जन्मठेपेची शिक्षा, पतीच्या खूनाचा आरोप; तो व्हिडिओ झालेला व्हायरल

Saina Nehwal : अभिनेता सिद्धार्थचा माफीनामा वाचला, सायना नेहवालचा रिप्लाय आला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2022 15:37 IST

Saina Nehwal : सायनाचे वडील हरवीर सिंह नेहवाल यांनीही सिध्दार्थला फैलावर घेत, त्यानं माफी मागावी, अशी मागणी केली. सर्व बाजूंनी टीकेची झोड उठल्यानंतर अखेर सिद्धार्थने सायनाची माफी मागितली आहे.

नवी दिल्ली - भारताची बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल (Saina Nehwal) हिच्याबद्दल आक्षेपार्ह ट्विट करणं अभिनेता सिद्धार्थ (Siddharth) याला चांगलंच महागात पडलं. त्याच्या या ट्विटनंतर सिद्धार्थ लोकांच्या निशाण्यावर आला. सोशल मीडिया युजर्सनी सिद्धार्थवर टीकेचा भडीमार केला. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यासह क्रीडा मंत्री किरण रिजिजू यांनीही सिद्धार्थचा तिखट शब्दात समाचार घेतला. तर, महिला आयोगानेही सिद्धार्थविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. मात्र, आता या प्रकरणावर पडदा पडल्याचे दिसून येत आहे. कारण, सिद्धार्थला सायनाने माफ केले आहे.  सायनाचे वडील हरवीर सिंह नेहवाल यांनीही सिध्दार्थला फैलावर घेत, त्यानं माफी मागावी, अशी मागणी केली. सर्व बाजूंनी टीकेची झोड उठल्यानंतर अखेर सिद्धार्थने सायनाची माफी मागितली आहे. सायनाची माफी मागत, सिद्धार्थने एक खुलं पत्र लिहिलं आहे. त्यावर, सायनाने प्रतिक्रिया देत सिद्धार्थने माफी मागितल्याचा आनंद झाल्याचं म्हटलं आहे. 

सायनाने ANI शी बोलताना सिद्धार्थच्या माफीनाम्यावर प्रत्युत्तर दिलंय. त्याने माझ्याबद्दल काहीतरी लिहिलं, आणि नंतर माफी मागितली. मला नाही माहिती, ते एवढं व्हायरल कसं झालं. ट्विटर ट्रेंडमध्ये माझं नाव पाहून मी आश्चर्यचकित झाले. सिद्धार्थने माफी मागितली, याचा मला आनंद झाला, असे सायनाने म्हटले. म्हणजे, सायनाने सिद्धार्थला मोठ्या मनाने माफ केले आहे.  

काय आहे सिद्धार्थचं पत्र

‘प्रिय सायना, काही दिवसांपूर्वी मी तुझ्या एका ट्विटला उत्तर देताना एक उपरोधिक विनोद केला. त्यासाठी मी तुझी माफी मागू इच्छितो. माझे तुझ्याशी मतभेद असू शकतात. तुझे ट्विट वाचताना माझी नाराजी वा राग शब्दरूपात बाहेर आला. पण, म्हणून मी वापरलेल्या शब्दांचे समर्थन करू शकत नाही.

माझ्यात यापेक्षा अधिक ग्रेस आहे. त्या विनोदाबद्दल बोलायचं तर, तो काही फार चांगला नव्हता. त्या विनोदासाठी सॉरी. तो ज्या पद्धतीने पोहोचायला हवा होता तसा पोहोचला नाही. कुणालाही दुखावण्याचा माझा हेतू नव्हता. मी महिलांचा नेहमीच आदर करतो. महिला म्हणून तुझ्यावर टीका करायचं म्हणून ते ट्विट नव्हतं. तू नेहमीच माझ्यासाठी चॅम्पियन असशील आणि हे मी प्रामाणिकपणे म्हणतोय. आशा करतो, माझी माफी स्वीकारून जे काही झालं ते विसरून तू पुढे जाशील... 

काय आहे ट्विट प्रकरण

सायना नेहवालने नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल एक ट्विट केलं होतं. त्यामध्ये तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौ-यादरम्यान झालेल्या सुरक्षेतील त्रुटीवरून चिंता व्यक्त केली होती. ‘जर आपल्या पंतप्रधानांच्या सुरक्षेवरच प्रश्न उपस्थित होत असतील, तर तो देश स्वत:ला सुरक्षित म्हणू शकत नाही. पंजाबमध्ये जे काही घडलं, त्याची मी कठोर शब्दांत निंदा करते,’ असे ट्विट तिने केलं होतं. सायनाच्या ट्विटवर अभिनेता सिद्धार्थने ट्विट केलं होतं. यामध्ये त्याने द्विअर्थी शब्दांचा वापर करत पुढे ‘शेम ऑन यू रिहाना’ असं लिहिलं होतं. लोकांनीही त्याच्या या ट्वीटवर आक्षेप घेतला होता. तसेच महिला आयोगानेही यासंदर्भात सिद्धार्थला नोटीस जारी केली होती.

टॅग्स :Saina Nehwalसायना नेहवालTwitterट्विटरNarendra Modiनरेंद्र मोदी