Pahalgam Terror Attack: पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याने सगळा देश हादरला आहे. पाकिस्तानातील लष्कर-ए-तोयबा पुरस्कृत द रेझिस्टन्स फ्रंट या संघटनेच्या दहशतावाद्यांनी हा हल्ला केला. या हल्ल्याचा तपास आता सुरू करण्यात आला असून, हल्ल्यातील मास्टरमाईंडबद्दल महत्त्वाची माहिती समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुप्तचर यंत्रणांच्या तपासानुसार द रेझिस्टन्स फ्रंटचा म्होरक्याने पूर्वनियोजितपणे हा हा हल्ला केला आहे. यात पाकव्याप्त काश्मिरातील दोन अतिरेक्यांचाही समावेश आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
द रेझिस्टन्स फ्रंटच्या कमांडर सैफुल्लाह कसुरी ऊर्फ खालीद हा या हल्ल्याचा मास्टरमाईंड आहे. त्यांने पाकव्याप्त काश्मिरातील दोन दहशतवाद्यांच्या मदतीने या हल्ल्याचा कट रचला.
सात दिवस केली रेकी, नंतर केला हल्ला
या हल्ल्याबद्दल आता हळूहळू माहिती समोर येत आहे. दहशतवाद्यांनी हल्ला करण्यापूर्वी पहलगाममधील बैसरन घाटीची पाहणी केली. सहा दहशतवाद्यांनी हा हल्ला केला. एक एप्रिल ते सहा एप्रिल दरम्यान दहशतवाद्यांनी या परिसराची पाहणी केली.
सुरक्षा जवानांना सापडली मोटारसायकल
सुरक्षा जवानांना घटनास्थळापासून काही अंतरावर एक मोटारसायकल सापडली आहे. जिला नंबरप्लेट नाही. ही गाडी दहशतवाद्यांकडून वापरली गेली असावी, असा संशय आहे. सैफुल्लाह याने संपूर्ण हल्ल्याचा कट रचला आणि त्यानंतर सहा दहशतवाद्यांनी अचानक पर्यटकांना घेरत हल्ला केला.
या घटनेत आतापर्यंत २६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १७ जण जखमी झाले आहे. दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे काश्मीरला पोहोचले. त्यांनी ज्या ठिकाणी दहशतवादी हल्ला झाला, त्या ठिकाणाला भेट दिली. मृतांना श्रद्धांजली अर्पण केली. त्याचबरोबर मृतांच्या नातेवाईकांचेही शाह यांनी सांत्वने केले.