शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

नदी ओलांडून मेघालयात शिरला, प. बंगालमार्गे मुंबईत आला; सैफच्या हल्लेखोरानं कशी केली भारतात एन्ट्री? जाणून थक्क व्हाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 14:41 IST

चौकशीदरम्यान, या हल्लेखोराने बांगलादेशातून भारतात कसा प्रवेश केला यासंदर्भातही माहिती दिली आहे...

सैफ अली खानच्या घरात घुसून त्याच्यावर चाकू हल्ला करणाऱ्या बांगलादेशी घुसखोरासंदर्भात सातत्याने नव-नवी माहिती समोर येत आहे. चौकशीदरम्यान, या हल्लेखोराने बांगलादेशातून भारतात कसा प्रवेश केला यासंदर्भातही माहिती दिली आहे.

सैफवर चाकू हल्ला करणाऱ्या हल्लेखोराचे नाव मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद असे आहे. जेव्हा पोलिसांनी त्याला पकडले तेव्हा तो भारतीय असल्याचा कोणताही पुरावा याढळून आला नाही. त्याच्याकडे सापडलेल्या मोबाईल फोनवरून तो बांगलादेशी असल्याचे उघड झाले. कारण तो बांगलादेशात राहत असलेल्या त्याच्या आई-वडिलांच्या सातत्याने संपर्कात होता. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता, तो बांगलादेशातून भारतात आल्याची संपूर्ण कहाणी समोर आली.

नदी ओलांडून मेघालयात शिरला -शहजाद ऑगस्ट २०२४ मध्ये भारतात आला. त्याने बांगलादेश आणि मेघालय सीमेवरील दावकी नदी ओलांडून भारतात प्रवेश केला. यानंतर ते काही महिने पश्चिम बंगालमध्ये राहिले. तेथे त्याने एका व्यक्तीच्या आधार कार्डचा वापर करून सिम कार्ड खरेदी केले आणि आपले नाव बदलून विजय दास नावाने वावरू लागला.

पश्चिम बंगालमधून थेट मुंबई - मोहम्मद शरीफुल पश्चिम बंगालहून थेट मुंबईत आला. तो मुंबईत काम शोधत होतो. पण कागदपत्रे नसल्याने त्याला चांगले काम मिळाले नाही. यामुळे तो साफसफाई आणि मजूरीसारखी छोटी-मोठी कामे करू लागला. त्याला वरळी आणि ठाण्यातील पबमध्ये क्लिनरचे कामही मिळाले होते. मात्र तो तिथेही चोरी करताना पकडला गेला. आता त्याने बांगलादेशात परत जाण्याची योजना आखली होती, मात्र, यासाठी त्याला ५० हजार रुपयांची आवश्यकता होती. यामुळे त्याने मोठा हात मारण्याच्या इराद्यात होता.

सैफवर झाला होता जीवघेणा हल्ला - सैफ अली खानच्या घरात शिरून आरोपी चोराने त्याच्यावर चाकूने हल्ला केला होता. सैफवर सहा वेळा चाकूने वार करण्यात आले होते. त्याच्या पाठीत अडीच इंचाचा चाकूचा तुकडाही आढळला. ही घटना १६ जानेवारीला पहाटे घडली. यानंतर, चार दिवसांनी, पोलिसांनी सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजादला अटक केली. सध्या आरोपी १४ दिवसांच्या रिमांडवर आहे आणि पोलिस त्याची चौकशी करत आहेत.

टॅग्स :Saif Ali Khanसैफ अली खान BangladeshबांगलादेशPoliceपोलिसwest bengalपश्चिम बंगालMumbaiमुंबईinfiltrationघुसखोरी