साईबाबा देव नाहीत - स्‍वामी स्‍वरूपानंदांचे वादग्रस्त वक्तव्य

By Admin | Updated: June 23, 2014 12:15 IST2014-06-23T12:07:18+5:302014-06-23T12:15:44+5:30

शिर्डीचे साईबाबा हे देव नसून त्यांची पूजा करणे हे हिंदू धर्मात फूट पाडण्याचे कारस्थान आहे, असे वादग्रस्त वक्तव्य द्वारकापीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद सरस्वती यांनी केले आहे

Saibaba is not God - controversial statement of Swami Swaroopanand | साईबाबा देव नाहीत - स्‍वामी स्‍वरूपानंदांचे वादग्रस्त वक्तव्य

साईबाबा देव नाहीत - स्‍वामी स्‍वरूपानंदांचे वादग्रस्त वक्तव्य

>ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. २३ - शिर्डीचे साईबाबा हे देव नसून त्यांची पूजा करणे हा हिंदू धर्मात फूट पाडण्याचे कारस्थान आहे, असे वादग्रस्त वक्तव्य द्वारकापीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद सरस्वती यांनी केले आहे. साईबाबांच्या पूजेला प्रोत्साहन देणारे लोक हिंद धर्म कमकुवत करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. 
साईबाबा हे देश-विदेशतील भक्तांचे श्रद्धास्थान असून लाखो भक्त त्यांच्या दर्शनासाठी शिर्डी येथे येतात. मात्र लोकांना पूजनीय असणा-या साईबाबांबद्दल आक्षेप घेऊन स्वरूपानंद यांनी नवीन वाद निर्माण केला आहे. 
ते म्हणाले, 'हिंदू धर्मात अवतार व गुरूची पूजा होते. हिंदू धर्मात जे २४ अवतार झाले आहे, त्यात कलियुगात फक्त बुद्ध आणि कल्कि यांचा अवतार आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत साईबाबांची पूजा करण्यात काहीच अर्थ नाही. साईबाबा ना अवतार आहेत ना गुरू'. साईबाबांच्या नावावर देऊळ बांधणे चुकीचे असल्याचेही ते म्हणाले. तसेच साईबाबा हे हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक आहेत, हाही गैरसमज असल्याचे स्वरुपानंद यांनी सांगितले मुस्लिम लोक त्यांची पूजा करत नाहीत, त्यांच्या दर्शनासाठी जात नाहीत, मग त्यांना हिंदू-मुस्लिमांच्या ऐक्याचे प्रतीक कसे म्हणता येईल, असा सवालही त्यांनी विचारला. 
यापूर्वीही स्वरुपानंद सरस्वती अनेक वेळा वादाच्या भोव-यात सापडले होते. लोकसभा निवडणुकीवेळी 'हर हर मोदी, घर घर मोदी ' या घोषणांवर त्यांनी आक्षेप घेतला होता. तर निवडणुकीदरम्यानच स्वरुपांनद यांनी एका पत्रकाराच्या थोबाडीत मारली होती. पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी किंवा अरविंद केजरीवाल यांच्यापैकी तुम्हाला कोण योग्य उमेदवार वाटतो, असा प्रश्न एका पत्रकाराने त्यांना विचारला असता, त्यांनी त्या पत्रकाराला थप्पड मारली होती. त्याच्या या वर्तणुकीवर सर्व स्तरांतून टीका करण्यात आली होती.  
 

Web Title: Saibaba is not God - controversial statement of Swami Swaroopanand