साईसंस्थानने साई विद्यापीठाची स्थापना करावी चंद्रभानु सतपथी : जगभरात साईंच्या प्रसार-प्रचारासाठी प्रयत्न

By Admin | Updated: August 20, 2015 22:10 IST2015-08-20T22:10:09+5:302015-08-20T22:10:09+5:30

शिर्डी : साईबाबा संस्थानने साईंच्या कार्याचा प्रचार व प्रसार व्हावा याकरता संशोधन कार्यावर भर देऊन साई विद्यापीठाची स्थापना करावी, असे आवाहन डॉ़चंद्रभानु सतपथी(गुरूजी) यांनी केले़

Sai University to set up Sai University, Chandrabhanu Satpathy: Efforts to spread the message of Sai across the globe | साईसंस्थानने साई विद्यापीठाची स्थापना करावी चंद्रभानु सतपथी : जगभरात साईंच्या प्रसार-प्रचारासाठी प्रयत्न

साईसंस्थानने साई विद्यापीठाची स्थापना करावी चंद्रभानु सतपथी : जगभरात साईंच्या प्रसार-प्रचारासाठी प्रयत्न

र्डी : साईबाबा संस्थानने साईंच्या कार्याचा प्रचार व प्रसार व्हावा याकरता संशोधन कार्यावर भर देऊन साई विद्यापीठाची स्थापना करावी, असे आवाहन डॉ़चंद्रभानु सतपथी(गुरूजी) यांनी केले़
साईबाबांच्या कार्याचा व शिकवणुकीचा देश-विदेशात प्रचार करणार्‍या डॉ़सतपथी यांचा संस्थानच्या वतीने अध्यक्ष तथा जिल्हा प्रधान न्यायाधीश विनय जोशी,जिल्हाधिकारी अनिल कवडे, कार्यकारी अधिकारी राजेंद्र जाधव व खासदार सदाशिव लोखंडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला़ देश-विदेशातील साडेतीनशेहून अधिक मंदिरांच्या निर्मितीत योगदान असलेल्या व अमेरिकन संसदेत साईंचा महिमा संागणार्‍या डॉ़सतपथी यांच्या कार्याची चित्रफित दाखवण्यात आली़ कार्यकारी अधिकारी जाधव यांनी डॉ़ सतपथी यांचा परिचय करून दिला़ ग्रामस्थांच्या वतीनेही डॉ़ सतपथींचा सत्कार करण्यात आला़
हा सत्कार माझा नसून साईंच्या विचारांचा आहे. यात साईभक्तांचे मोठे योगदान असल्याचे डॉ़ सतपथी यांनी सांगितले़ २५ वर्षानंतर हा योग आला.शिर्डीत आपला सत्कार होइल असे कधी वाटले नव्हते. आपण सर्वप्रथम शिर्डीमध्ये २ नोव्हेंबर १९८९ मध्ये आलो. आज हा प्रवास एका बिंदूवर येवून केंद्रीत झाला असून जगभर साईनामाचा गजर सुरू झाला आहे.साईबाबांनी सर्व धर्म समभावाचा संदेश मानव जातीला दिला आहे.प्रत्येकाने देवाला आपल्या आईवडिलांमध्ये,बहीण,भावामध्ये बघायला हवे.सर्व सुख -दु:खात फक्त साईंचे स्मरण करा,त्यांच्या आशीर्वादानेच सर्व कार्ये सफल होतील असेही त्यांनी सांगितले़
यावेळी संस्थानचे अध्यक्ष विनय जोशी, जिल्हाधिकारी कवडे म्हणाले की , समाजातील सामान्य माणसाला साईबाबांची शिकवण समजावून सांगून डॉ.सतपथी गुरूजी यांनी जगभरात साईबाबांच्या कार्याचा प्रसार करून शिर्डीसह देशाचा सन्मान वाढविला आहे़ या वेळी खा.सदाशिव लोखंडे,शिर्डीचे माजी नगराध्यक्ष कैलास कोते,दिलीप संकलेचा यांची भाषणे झाली. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सतीश रेड्डी,आसामचे अतिरिक्त मुख्य सचिव टी़वाय़दास, मुख्य माहिती अधिकारी एस.एच.दास, केंद्रीय राखीव पोलीस दलाचे अतिरिक्त महासंचालक अरुण कुमार, पुणे कॅन्टोन्मेंटचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजिव कुमार, माजी खा.अर्चना नायक, तिरूपती विद्यापिठाचे डॉ.रघुनाथ रेड्डी,राज्याचे मुख्य पोस्ट मास्तर जनरल अशोक दास,जितेंद्र शेळके यांच्यासह देशभरातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. संस्थानचे उपकार्यकारी अधिकारी आप्पासाहेब शिदे यांनी आभार मानले.(तालुका प्रतिनिधी)
------------------------------------------------------------
2008-2015-साई-02डॉ़सतपथी सत्कार,जेपीजे
___________________________________________________________________

Web Title: Sai University to set up Sai University, Chandrabhanu Satpathy: Efforts to spread the message of Sai across the globe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.