औषध खरेदीत साई संस्थानची कोट्यवधींची बचत -------------
By Admin | Updated: August 2, 2015 23:31 IST2015-08-02T23:31:41+5:302015-08-02T23:31:41+5:30
शिर्डी : साई संस्थान प्रशासनाने यंदा वर्षानुवर्षाची औषध खरेदीची पद्धत बदलून ठराविक कंपन्यांची मक्तेदारी मोडीत काढल्याने संस्थानची तब्बल ७ कोटी ६५ लाख रूपये बचत झाली आहे़

औषध खरेदीत साई संस्थानची कोट्यवधींची बचत -------------
श र्डी : साई संस्थान प्रशासनाने यंदा वर्षानुवर्षाची औषध खरेदीची पद्धत बदलून ठराविक कंपन्यांची मक्तेदारी मोडीत काढल्याने संस्थानची तब्बल ७ कोटी ६५ लाख रूपये बचत झाली आहे़संस्थान रूग्णालयात औषध खरेदीत आजवर एकच पद्धत अवलंबण्यात येत होती़ त्यात ठराविक कंपन्यांची मक्तेदारी होती़ या कंपन्यांच्या दराने संस्थानला औषधे व सर्जिकल साहित्य खरेदी करावे लागत होते़यंदा संस्थानचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र जाधव यांनी खरेदीत स्वत: लक्ष घातले़ निविदेच्या अटी, शर्ती शासन नियमाप्रमाणे निश्चित केल्या़ निविदेसाठी पुरेसा कालावधी दिला़ जेनरीक औषधांची अट घातली़ तसेच अन्य संस्था, शासनाची औषध खरेदी पद्धती, त्या ठिकाणचा कंपन्यांचा औषध पुरवठा आदींचा तुलनात्मक अभ्यास केला़ त्यातून स्थानिक कंपन्यांची मक्तेदारी मोडीत काढत निम्नतम दर ठरविताना गुणवत्तेशी कोणतीही तडजोड न करता सर्व डॉक्टरांच्या शिफारशी विचारात घेऊन निर्णय घेतले गेले़ (प्रतिनिधी)