साई ओमीराम साहिब यांचा १२ रोजी सत्संग

By Admin | Updated: May 8, 2014 22:06 IST2014-05-08T22:06:30+5:302014-05-08T22:06:30+5:30

नाशिक : वसणशाह दरबार उल्हासनगर येथील युवा संत साई ओमीराम साहिब यांचे येत्या १२ रोजी सायंकाळी ६ वाजता गोदावरी नदीकाठी सत्संग, प्रवचन होणार आहे. सदर कार्यक्रम हा वसणशाह दरबार व सिंधी समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी राज्यभरातून भाविक येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. कार्यक्रमास शहरातील सिंधी बांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन समाजाचे महामंत्री दीपक चौंदवाणी यांनी केले आहे.

Sai Omi Ram Sahib's 12th Satsanga | साई ओमीराम साहिब यांचा १२ रोजी सत्संग

साई ओमीराम साहिब यांचा १२ रोजी सत्संग

४ प्रशासकीय, तर ८६३ होणार विनंती स्वरूपातील बदल्या
नाशिक : शासनाने बदल्यांबाबत वेळापत्रक जाहीर केल्यानंतर जिल्हा परिषदेनेही कर्मचार्‍यांच्या बदल्यांसाठी वेळापत्रक आखले असून, एकूण १५ हजार ५१५ कर्मचार्‍यांपैकी बदलीपात्र कर्मचार्‍यांची संख्या १६५७ असून, त्यात ७९४ प्रशासकीय, तर ८६३ विनंती स्वरूपातील बदल्यांचा समावेश आहे.
बदलीपात्र कर्मचार्‍यांची विभागनिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे- कंसात बदलीचे वेळापत्रक- सामान्य प्रशासन- कक्ष अधिकारी विनंती व प्रशासकीय- प्रत्येकी २, कार्यालयीन अधीक्षक- प्रत्येकी ५, विस्तार अधिकारी- प्रत्येकी ३, वरिष्ठ सहायक- प्रशासकीय- ६ व विनंती- १७, कनिष्ठ सहायक- प्रशासकीय- २१ व विनंतीच्या ४५ अशा एकूण ३७ प्रशासकीय व ७२ विनंती (१७ मे), अर्थ विभाग- सहा. लेखाधिकारी- प्रशासकीय व विनंतीच्या प्रत्येकी ३, कनिष्ठ लेखाधिकारी- प्रत्येकी २, कनिष्ठ सहायक लेखा- प्रत्येकी ४, वरिष्ठ सहायक लेखा- प्रशासकीय- ५, विनंती- ६ एकूण १४ प्रशासकीय व १५ विनंती (१७ मे), कृषी विभाग- कृषी अधिकारी- प्रत्येकी ३, विस्तार अधिकारी- प्रत्येकी ४, एकूण- ७ प्रशासकीय व ७ विनंती- १४ (१७ मे), आरोग्य विभाग- आरोग्यसेवक- प्रत्येकी १७, आरोग्य सहायक- प्रत्येकी ७, आरोग्यसेविका- प्रत्येकी ३१, आरोग्य सहायिका- प्रत्येकी ५, औषधनिर्माण अधिकारी- प्रत्येकी ६, प्रयोगशाळा तंत्रज्ञ- प्रत्येकी ३, विस्तार अधिकारी- प्रत्येकी १ व कुष्ठरोग तंत्रज्ञ- प्रत्येकी १ अशा एकूण ७१ प्रशासकीय व ७१ विनंती (१८ मे), लघु पाटबंधारे विभाग- शाखा अभियंता- प्रत्येकी ७ (१९ मे), बांधकाम विभाग-१- कनिष्ठ अभियंता- प्रशासकीय ४ व विनंती- ८, स्थापत्य अभियांत्रिकी- प्रशासकीय- ६ व विनंती- १० एकूण १७ प्रशासकीय व २५ विनंती (१९ मे), पशुसंवर्धन- सहायक पशुसंवर्धन विकास अधिकारी- प्रत्येकी ४, पशुधन पर्यवेक्षक- प्रत्येकी- १५ अशा एकूण १९ प्रशासकीय व १९ विनंती (१९ मे), एकात्मिक बालविकास विभाग- पर्यवेक्षिका- प्रत्येकी- १७ (२० मे), ग्रामपंचायत- ग्रामसेवक- २९ प्रशासकीय व ४७ विनंती, ग्रामविकास अधिकारी- ६ प्रशासकीय व ११ विनंती, विस्तार अधिकारी- ३ प्रशासकीय व ५ विनंती अशा एकूण ३८ प्रशासकीय व ६३ विनंती (२० मे), शिक्षण- विस्तार अधिकारी- प्रत्येकी- ९, केंद्रप्रमुख- प्रत्येकी- ११, मुख्याध्यापक- प्रत्येकी ३१, पदवीधर प्राथमिक शिक्षक- प्रत्येकी- २५, प्राथमिक शिक्षक- प्रत्येकी ४९८ अशा एकूण ५७४ प्रशासकीय व ५७४ विनंती (२२ व २३ मे) अशा एकूण ७९४ प्रशासकीय व ८६३ विनंती स्वरूपाच्या मिळून १६५७ कर्मचार्‍यांच्या बदल्या होतील. (प्रतिनिधी)
इन्फो..
अर्थव्यवहार नको
सर्व कर्मचार्‍यांनी कोणत्याही कर्मचारी अथवा अधिकार्‍यांमार्फत तसेच बदलीसाठी कोेणीही काहीही सांगितले तरी अर्थव्यवहार करू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Web Title: Sai Omi Ram Sahib's 12th Satsanga

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.