शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मतदान केंद्राजवळ 'नमो' फूड पॅकेट्सचं वाटप; निवडणूक आयोगानं मागवला अहवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2019 17:47 IST

पोलिसांकडून नमो फूड पॅकेट्सचं वाटप झाल्यानं वाद

नोएडा: लोकसभा निवडणुकीचं पहिल्या टप्प्यातलं मतदान सुरू असताना नोएडात मतदान केंद्राजवळ 'नमो' फूड पॅकेट्सचं वाटप करण्यात आलं. गौतम बुद्ध नगरमध्ये हा प्रकार घडला. या प्रकरणी उत्तर प्रदेशच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी गौतम बुद्ध नगरच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडून अहवाल मागवला आहे. यामुळे निवडणूक आचारसंहितेचा भंग झाला की नाही, याबद्दलचा तपास मुख्य निवडणूक अधिकारी करणार आहेत. गौतम बुद्ध नगरच्या वरिष्ठ पोलीस अधीक्षकांनी यामध्ये काही गैर नसल्याचं सांगितलं. मतदान केंद्राजवळ वाटण्यात आलेल्या फूड पॅकेट्सचा भारतीय जनता पार्टीशी संबंध नसल्याचं ते म्हणाले. भाजपाच्या प्रचार अभियानात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उल्लेख अनेकदा नमो असा केला जातो. त्यामुळे ही फूड पॅकेट्स भाजपाकडून वाटण्यात आली, अशी चर्चा होती. 'राजकीय पक्षाच्या वतीनं पोलिसांकडून खाद्यपदार्थांच्या पाकिटांचं वाटप करण्यात आल्याची माहिती काहीजणांनी पसरवली. ती अतिशय चुकीची आहे. ते खाद्यपदार्थ नमो फूड शॉपमधून मागवण्यात आले होते. त्यामुळे त्यावर नमो असा उल्लेख होता. मात्र काहींनी जाणूनबुजून राजकीय फायद्यासाठी अफवा पसरवली. एखाद्या दुकानातून पदार्थ खरेदी करू नका, अशी कोणतीही अधिकृत सूचना देण्यात आलेली नाही,' असं वरिष्ठ पोलीस अधीक्षक वैभव कृष्णा यांनी सांगितलं. 

जिल्हा दंडाधिकाऱ्यांनीदेखील यामध्ये काहीच चूक नसल्याचं सांगितलं. 'एखाद्या दुकानातून घेतलेल्या खाद्यपदार्थ्यांच्या बॉक्सवर दुकानाचं नाव असतं. त्या नावाचा कोणी दुसरा अर्थ घेऊ नये. मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांनी खायला हवं की नको?', असं जिल्हा दंडाधिकारी म्हणाले. विशेष म्हणजे यानंतर काही पत्रकार नमो फूड शॉपमध्ये पोहोचले. तेव्हा त्यांना दुकानातून पॅकेट्स पाठवण्यात न आल्याची माहिती मिळाली. 'आम्हाला या ऑर्डरबद्दल काहीही कल्पना नाही. आमचं दुकान बुधवार दुपारपासून बंद आहे,' अशी माहिती नमो फूड शॉपच्या कर्मचाऱ्यानं दिली. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकUttarakhand Lok Sabha Election 2019उत्तराखंड लोकसभा निवडणूक 2019BJPभाजपाElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग