शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

बापरे! 'त्या' लॉकर्समध्ये पुन्हा सापडली 1.25 कोटींची रोकड; नोटांचे बंडल पाहून उडाली झोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2023 16:45 IST

प्रत्येकी 500 रुपयांच्या नोटांच्या बंडल स्वरूपात ही रोकड आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना लॉकरमध्ये सापडली आहे.

राजस्थानच्या जयपूरमधील गणपती प्लाझा येथे असलेल्या रॉयरा सेफ्टी वॉलेट्स कंपनीच्या खासगी लॉकर्सवर आयकर विभागाची कारवाई सुरूच आहे. आयकर विभागाने रॉयरा सेफ्टी वॉलेट आणि दोन खासगी लॉकरमधून 1 कोटी 25 लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे. प्रत्येकी 500 रुपयांच्या नोटांच्या बंडल स्वरूपात ही रोकड आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना लॉकरमध्ये सापडली आहे. गणपती प्लाझा कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या या लॉकर्सना आयकर विभागाने उच्च जोखमीच्या श्रेणीतील लॉकरमध्ये लिस्टेड केलं आहे.

लॉकर्स ऑपरेट करण्यापूर्वी आयकर विभागाने त्यांच्या मालकांना नोटीस बजावून तपासात सहकार्य करण्यास सांगितलं होतं. परंतु लॉकर्सचे केवायसी अपूर्ण असल्याने योग्य मालकाची माहिती मिळू शकली नाही. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे लॉकर चालवणाऱ्या लॉकर मालकाला बोलावून आयकर विभागाने ही कारवाई केली आहे. आतापर्यंत गणपती प्लाझाच्या लॉकर्समधून आयकर विभागाला एकूण आठ कोटींहून अधिक रोकड मिळाली आहे.

लॉकर्समध्ये सात कोटींचं सोनं सापडलं

सात कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. उच्च जोखमीच्या श्रेणीतील लॉकर चालवण्यासाठी आयकर विभाग आयकर कायद्यांतर्गत कारवाई करत आहे. लॉकर्सच्या मालकांमध्ये यामुळे घबराट निर्माण झाली आहे. अनेक लॉकर्स उघडणं अद्याप बाकी आहे.

भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर भाजपाचे राज्यसभा खासदार डॉ. किरोडीलाल मीणा यांनी नुकताच दावा केला होता की, या लॉकर्सची झडती घेतल्यास त्यामध्ये मोठ्या प्रमाणात बेनामी काळा पैसा सापडू शकतो. त्यानंतर आयकर विभागाने या लॉकर्सची चौकशी सुरू केली. येथे 1100 लॉकर्स आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :MONEYपैसा