रेल्वे इंजिनचे एक्सल बॉक्स तपासण्याची सूचना सुरक्षा परिसंवाद : यांत्रिक विभागाच्या कर्मचार्यांशी साधला संवाद
By Admin | Updated: August 3, 2015 22:26 IST2015-08-03T22:26:51+5:302015-08-03T22:26:51+5:30
सोलापूर :

रेल्वे इंजिनचे एक्सल बॉक्स तपासण्याची सूचना सुरक्षा परिसंवाद : यांत्रिक विभागाच्या कर्मचार्यांशी साधला संवाद
स लापूर : रेल्वे गाड्यांना होणारा विलंब टाळण्यासाठी ज्याप्रमाणे सी़ अँड डब्ल्यू़ शाखेचे कर्मचारी यार्डमध्ये डब्यांच्या एक्सल बॉक्सची तपासणी करतात त्याचप्रमाणे इंजिनच्या एक्सल बॉक्सचीही तपासणी करावी, अशी सूचना यांत्रिक विभागातील कर्मचार्यांना देण्यात आली़मध्य रेल्वेच्या यांत्रिक विभागाच्या वतीने रेल्वे कॉन्फरन्स हॉलमध्ये आयोजित केलेल्या सुरक्षा परिसंवादात ही सूचना मुख्य लोको निरीक्षक एस़टी़ उस्तुर्गे यांनी दिली़ वरिष्ठ मंडल यांत्रिकी अभियंते शिवाजी कदम यांच्या अध्यक्षतेखाली हा परिसंवाद पार पडला़ यावेळी मावळते डीआरएम जॉन थॉमस यांना निरोप देण्यात आला तर नवे डीआरएम ए़ के़ दुबे यांचे स्वागत करण्यात आले़ यावेळी दुबे यांनी काही सूचना दिल्या़ दरवर्षी रेल्वे विभागाला सहा विविध पुरस्कार दिले जातात़ यापैकी जास्तीत जास्त पुरस्कार प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे दुबे यांनी सांगितले़ तसेच रेल्वे इंजिनचा चांगल्यापद्धतीने वापर करुन तेल वाचवण्याचीही सूचना केली़ सहायक मंडल यांत्रिक अभियंते आऱ एच़ नाशिककर यांनीही काही सूचना केल्या़ सूत्रसंचालन एस़ एस़ भावे यांनी केले तर आभार एस़ एस़ साळवे यांनी मानले़ (प्रतिनिधी)़भविष्यात एलएचबी कोच या परिसंवादामध्ये यांत्रिक विभागाच्या पर्यवेक्षकांनी इंजिन आणि डब्यांची काळजी याबाबत प्रश्न मांडले़ त्यांना संबंधित अधिकार्यांनी उत्तरेही दिली़ भविष्यात आधुनिकतेने तयार होणारे एलएचबी कोच रेक यात्रेकरुंसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे़ बे्रड बायंडिंग अशा समस्याही सुटलेल्या असतील अशी माहिती दौंडचे सहायक मंडल यांत्रिक अभियंते युनूस अंसार यांनी दिली़