सईद यांचा आज शपथविधी
By Admin | Updated: March 1, 2015 01:30 IST2015-03-01T01:30:41+5:302015-03-01T01:30:41+5:30
आज रविवारी होणारा शपथविधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा लक्षात घेता शहरात कडेकोट सुरक्षा बंदोबस्त करण्यात आला आहे.

सईद यांचा आज शपथविधी
जम्मू : जम्मू-काश्मीरमध्ये मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या नेतृत्वातील भाजपा-पीडीपी युती सरकारचा आज रविवारी होणारा शपथविधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा लक्षात घेता शहरात कडेकोट सुरक्षा बंदोबस्त करण्यात आला आहे.
वरिष्ठ पोलीस अधीक्षक उत्तम चंद यांनी शनिवारी जम्मू आणि आजूबाजूच्या परिसरात करण्यात आलेल्या सुरक्षा व्यवस्थेबाबत माहिती दिली. जम्मू विद्यापीठाच्या जनरल जोरावर सिंग आॅडिटोरियममध्ये नवीन सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार असून, या ठिकाणी जाणाऱ्या सर्व मार्गांवरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. ७९ वर्षीय सईद यांच्यासोबत त्यांच्या मंत्रिमंडळातील पीडीपी आणि भाजपाचे प्रत्येकी १२ मंत्री पदाची शपथ घेणार आहेत.