Sadly in Rajiniket, due to floods in Tamil Nadu, celebration of birthday annulled | तामिळनाडूतील पुरामुळे रजनीकांत दु:खी, वाढदिवसाचे सेलिब्रेशन रद्द
तामिळनाडूतील पुरामुळे रजनीकांत दु:खी, वाढदिवसाचे सेलिब्रेशन रद्द

ऑनलाइन लोकमत 

चेन्नई, दि. ७ -  मुसळधार पावसामुळे तामिळनाडूत निर्माण झालेल्या भीषण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर  सुपरस्टार रजनीकांतने आपल्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन रद्द केले आहे. रजनीकांतने चाहत्यांना आपला वाढदिवस साजरा न करण्याचे आवाहन केले आहे. रजनीकांतचा वाढदिवस दरवर्षी तामिळनाडूत मोठया उत्साहात सणासारखा साजरा केला जातो. 

शतकातील पावसाचा सर्वात मोठा तडाखा सोसल्यानंतर तामिळनाडू हळूहळू पूर्वपदावर येत आहे. मात्र आत्ता तेथील लोकांना मोठ्या मानसिक आर्थिक आधाराची गरज आहे. त्यामुळे वाढदिवस साजरा करण्यापेक्षा पूरग्रस्त नागरीकांना पुर्नवसनात मदत करा असे आवाहन रजनीकांत यांनी चाहत्यांना केले आहे. रजनीकांतच्या वाढदिवसाच्या दिवशी एनथिरन २ चित्रपटाची घोषणा करण्यात येणार होती, मात्र आता ही घोषणाही अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे. 
Web Title: Sadly in Rajiniket, due to floods in Tamil Nadu, celebration of birthday annulled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.