साध्वी प्राची यांनी स्वतःच मुलांना जन्म द्यावा - रामगोविंद चौधरी
By Admin | Updated: February 4, 2015 17:12 IST2015-02-04T17:12:01+5:302015-02-04T17:12:01+5:30
साक्षी महाराज आणि साध्वी प्राची यांनी स्वतः आधी लग्न करुन मुलांना जन्म द्यावे असे वादग्रस्त विधान उत्तरप्रदेशमधील शिक्षण मंत्री रामगोविंद चौधऱी यांनी केले.

साध्वी प्राची यांनी स्वतःच मुलांना जन्म द्यावा - रामगोविंद चौधरी
>ऑनलाइन लोकमत
लखनौ, दि. ४ - हिंदूंनी चार अपत्यांना जन्म द्यावा असे विधान करणा-या साक्षी महाराज आणि साध्वी प्राची यांनी स्वतःच आधी लग्न करुन मुलांना जन्म द्यावे असे वादग्रस्त विधान उत्तरप्रदेशमधील शिक्षण मंत्री रामगोविंद चौधरी यांनी केले आहे.
काही दिवसांपूर्वी साध्वी प्राची यांनी उत्तरप्रदेशमधी बदायू येथील हिंदू संमेलनात हिंदूंनी चार मुलांना जन्म द्यावे असा पुनरुच्चार त्यांनी केला होता. या सभेत साध्वी प्राची यांनी लव्ह जिहादविषयीही आक्षेपार्ह विधान केले होते. यावर कारवाई करणार का असा प्रश्न उत्तरप्रदेश सरकारमधील शिक्षणमंत्री रामगोविंद चौधरी यांना बुधवारी विचारण्यात आला. यावर चौधरी यांनी धार्मिक तेढ निर्माण करणा-यांवर कारवाईचे आश्वासन दिले खरे मात्र यानंतर साक्षी महाराज व साध्वी प्राची यांच्यावर टीका करताना चौधरी यांची जीभ घसरली. चौधरी म्हणाले, साध्वी प्राची, साक्षी महाराज किंवा त्यांच्यासारखी विचारधारा असलेले अन्य नेते, ती लोकं स्वतः लग्न करत नाही पण दुस-यांना मात्र किती मुलांना जन्म द्यावा यावर सल्ला देत बसतात. या मंडळींनी आधी स्वतः लग्न करावे आणि मुलांना जन्म द्यावा असे वादग्रस्त विधान चौधरी यांनी केले.