साध्वी निरंजन ज्योती यांचे ‘मौनासन’
By Admin | Updated: December 6, 2014 23:50 IST2014-12-06T23:50:23+5:302014-12-06T23:50:23+5:30
दिल्लीतील प्रचारसभेदरम्यान केलेल्या वादग्रस्त विधानावर माध्यमांशी बोलण्यास साध्वी निरंजन ज्योती यांनी नकार दिला आहे.

साध्वी निरंजन ज्योती यांचे ‘मौनासन’
कानपूर : दिल्लीतील प्रचारसभेदरम्यान केलेल्या वादग्रस्त विधानावर माध्यमांशी बोलण्यास साध्वी निरंजन ज्योती यांनी नकार दिला आहे. शनिवारी येथे माध्यम प्रतिनिधींनी अनेकवेळा प्रश्न विचारूनही यावर त्या मौन बाळगून राहिल्या.
केंद्रीय मंत्री साध्वी निरंजन ज्योती शनिवारी आपल्या फत्तेहपूर मतदारसंघात जाण्यासाठी कानपूरला आल्या होत्या. यावेळी नौबस्ताचे खाडेपूर गाव गाठत त्या छत्तीसगडच्या सुकुमा येथे नक्षली हल्ल्यात शहीद झालेले सीआरपीएफचे डेप्युटी कमांडंट बी.एस. वर्मा यांच्या घरी पोहोचल्या. या हल्ल्यात सीआरपीएफचे 14 जवान शहीद झाले होते.
साध्वी निरंजन ज्योती यांनी शहीद वर्मा यांच्या प्रतिमेस पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. पत्रकारांनी वादग्रस्त विधानाबाबत विचारले असता त्यांनी यावर काहीही बोलण्यास नकार दिला. अनेक वेळा प्रश्न विचारल्यानंतर त्या थेट गाडीत जाऊन बसल्या. दरम्यान, साध्वींच्या वादग्रस्त विधानावर विरोधी पक्षांनी गदारोळ केल्याने गेल्या आठवडय़ात संसदेचे कामकाज सुरळीतपणो पार पडू शकले नाही. संसदेतील नऊ विरोधी पक्षांनी निरंजन ज्योती यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. (वृत्तसंस्था)