शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

मातीचा ऱ्हास थांबवण्यासाठी सद्गुरूंनी सादर केली त्रिसूत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2022 06:09 IST

१९५ राष्ट्रांना एक केंद्रित कृतीच्या योजनेचे केले आवाहन 

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : मातीसाठीच्या १०० दिवसांच्या ३०,००० किलोमीटर मोटारसायकल प्रवासावर असलेल्या सद्गुरूंनी आयव्हरी कोस्टमधील अबीद्जानला उड्डाण केले आणि संयुक्त राष्ट्रसंघ वाळवंटीकरण प्रतिबंधक परिषदेच्या कॉन्फरन्स ऑफ पार्टीजच्या १५ व्या सत्रात १९५ राष्ट्रांच्या प्रतिनिधींना संबोधित केले. सद्गुरूंनी त्यांच्या संबोधनात एक व्यापक उद्दिष्ट सांगितले ते  म्हणजे  शेतजमिनीत  किमान ३ ते ६% सेंद्रिय सामग्री आहे, याची खात्री करणे आणि हे साध्य करण्यासाठी त्रिसूत्री धोरण सांगितले. 

सद्गुरूंनी माती वाचवा मोहिमेत जागतिक शेतजमिनीच्या ऱ्हासावर उपाययोजना सादर केली. आयव्हरी कोस्ट येथील सत्रात जमलेल्या जगातील सर्व राष्ट्रांना संबोधित करताना ते म्हणाले की, माती नामशेष होण्याच्या उंबरठ्यावरून मानवतेला परत आणण्यासाठी ही एक महत्त्वाची संधी आहे. ज्या मातीत ३ ते ६ % सेंद्रिय सामग्री आहे, अशा मातीतून पिकवलेल्या अन्नासाठी आग्रही असायला हवे. या उपक्रमाचा परिणाम म्हणून, लोक अधिक निरोगी, अधिक कार्यक्षम होऊन त्यांची रोग प्रतिकारशक्ती वाढेल. त्यामुळे हे स्पष्ट आहे की, उच्च दर्जाच्या अन्नाच्या अशा चिन्हाला तथाकथित ‘ऑरगॅनिक’ आणि ‘नॉन ऑरगॅनिक’ उत्पादनामध्ये फरक करण्याचा सध्याच्या पद्धतीपेक्षा कितीतरी अधिक अर्थ असेल. सद्गुरूंनी ट्विटरवर शेअर केले, सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे मातीला सजीव म्हणून ओळखणे आणि ती जिवंत ठेवणे. पृथ्वीवरील ८५% पेक्षा जास्त राष्ट्रे अजूनही मातीकडे निर्जीव वस्तू म्हणून पाहतात. यूएनसीसीडीचे कार्यकारी सचिव इब्राहिम थियाव यांनी त्यांच्या ट्विटमध्ये माती वाचवण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेबद्दल सद्गुरूंचे आभार मानले आहेत.

चळवळीला मिळतोय प्रचंड पाठिंबाn    २१ मार्च रोजी लंडनहून सुरू झालेला त्यांचा प्रवास पुढे सुरू ठेवण्यासाठी सद्गुरू युरोप आणि मध्य आशियामधून प्रवास करत मे महिन्यात अरब राष्ट्रांत पोहोचले, जिथे माती वाचवण्याच्या चळवळीला सरकार आणि नागरिकांकडून अनेक शुभेच्छा आणि प्रचंड पाठिंबा मिळाला.n    जगातील ३.५ अब्ज लोकांचा पाठिंबा मिळवून जगभरातल्या शासनांना मातीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी धोरणात्मक बदल करण्यासाठी प्रेरित करणे हे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे.