शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
2
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
3
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
4
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
5
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
6
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
7
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
8
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
9
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
10
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
11
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
12
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
13
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
14
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
15
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
16
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
17
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
18
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
19
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
20
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!

राहुल गांधी म्हणाले, "सद्दाम हुसैन आणि मुअम्मर गद्दाफीदेखील निवडणुका जिंकत होते"

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2021 08:31 IST

Rahul Gandhi : काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी स्वीडनच्या संस्थेच्या रिपोर्टचा हवाला देत भारत लोकशाही असेलेला देश राहिला नसल्याचा केला होता आरोप

ठळक मुद्देभारत लोकशाही असेलेला देश राहिला नसल्याचाही यापूर्वी केला होता आरोपसद्दाम हुसैन आणि मुअम्मर गद्दाफीहेदेखील निवडणुका जिंकत होते, राहुल गांधींचं वक्तव्य

 काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी स्वीडनच्या संस्थेच्या रिपोर्टचा हवाला देत भारत लोकशाही असेलेला देश राहिला नसल्याचा आरोप केला होता. तसंच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही हल्लाबोल केला होता. दरम्यान, मंगळवारी राहुल गांधी यांनी एका ऑनलाईन कार्यक्रमात सहभाग घेतला होता. तसंच इराकचे हुकुमशाह सद्दाम हुसैन आणि लिबियाचे मुअम्मर गद्दाफीहेदेखील निवडणुका जिंकत होते, असं वक्तव्य केलं. "सद्दाम हुसैन आणि गद्दाफी यांच्या शासन काळातही निवडणुका होत होत्या. तेदेखील निवडणुका जिंकत होते. असं नव्हतं की लोकं त्यांना मतं देत नव्हती. परंतु त्यांच्या मतांच्या सुरक्षेसाठी कोणतीही संस्थात्मक चौकट नव्हती," असं राहुल गांधी म्हणाले. राहुल गांधी यांनी ब्राऊन युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर आशुतो। वार्ष्णेय. अन्य सदस्य आणि विद्यार्थ्यांसोबत ऑनलाईन संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते."निवडणुका केवळ अशा नाहीत की लोकांनी जाऊन बटन दाबून आपल्याला मताच्या मिळालेल्या अधिकाराचा वापर करावा. निवडणूक ही एक संकल्पना आहे. निवडणूक ही एक संस्था आहे जी देशाची चौकट योग्यरित्या काम करत आहे किंवा नाही हे ठरवत असते. निवडणूक ती आहे की न्यायपालिका निष्पक्ष असाववी, संसदेत चर्चा व्हावी आणि कोणत्याही मतांच्या गणनेसाठी या आवश्यक बाबी आहेत," असंही ते म्हणाले. राहुल गांधींचं हे वक्तव्य अशावेळी आलं आहे, जेव्हा त्यांनी स्वीडनच्या एका संस्थेच्या अहवालाचा हवाला देत भारत आता लोकशाही असलेला देश राहिला नसल्याचं वक्तव्य केलं होतं. आणीबाणी चुकीचीकाही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी प्रोफेसर कौशिक बसू यांच्यासोबत संवाद साधला होता. चर्चेदरम्यान त्यांनी देशात इंदिरा गांधी यांनी लावलेली आणीबाणी चुकीची होती असं म्हणत आता देशात त्याच्यापेक्षाही वाईट काळ सुरू असल्याचं म्हटलं होतं. देशातील संस्थांमध्ये एका विशिष्ट विचारधारेच्या लोकांच्या प्रवेशाला बळकटी दिली जात असल्याचंही त्यांनी नमूद केलं होतं. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीonlineऑनलाइन