शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नोकरीवरुन काढल्यानं एचआर हेडवर झाडली गोळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2018 19:58 IST

ऑफिसला जाताना एचआरवर जीवघेणा हल्ला

गुरुग्राम : नोकरीवर काढल्याचा राग मनात धरुन एका व्यक्तीनं कंपनीच्या ह्युमन रिसोर्स हेडवर गोळी झाडली आहे. गुरुग्राममध्ये आज सकाळच्या सुमारास ही घटना घडली. विनेश शर्मा असं पीडित एचआर हेडचं नाव आहे. शर्मा त्यांच्या कारनं आयएमटी मानेसरस्थित कार्यालयात जात असताना हा प्रकार घडला. शर्मा हे मित्सुबिशी कंपनीचे कर्मचारी आहेत. दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी बंदुकीचा धाक दाखवून विनेश शर्मा यांना रोखण्याचा प्रयत्न केल्याची माहिती गुरुग्राम पोलिसांचे जनसंपर्क अधिकारी रविंद्र कुमार यांनी दिली. 'विनेश यांनी कार रोखली नाही. त्यांनी उलट कारचा वेग वाढवला. तेव्हा दुचाकीवर मागे बसलेल्या व्यक्तीनं त्यांच्यावर गोळी झाडली,' असं कुमार यांनी सांगितलं. विनेश यांना दोन गोळ्या लागल्या असून हल्लेखोराचा शोध सुरू असल्याची माहितीदेखील त्यांनी दिली. हल्लेखोराची ओळख पटली असून त्याचं नाव जोगिंदर असल्याचं पोलिसांनी सांगितलं. जोगिंदर घटनास्थळावरुन फरार झाला आहे. जोगिंदरनं विनेश यांच्यावर गोळी झाडल्यानंतर काही पादचाऱ्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. विनेश यांच्यावर रॉकलँड रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. नोकरीतील बेजबाबदारपणामुळे विनेश यांनी जोगिंदर यांची हकालपट्टी केल्याची माहिती कंपनीतील अधिकाऱ्यांनी दिली. यानंतर जोगिंदरनं विनेश यांना परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी दिली होती.  

टॅग्स :Crimeगुन्हा