सचिनने घेतली पंतप्रधानांची भेट

By Admin | Updated: October 17, 2014 02:38 IST2014-10-17T02:38:35+5:302014-10-17T02:38:35+5:30

खासदार सचिन तेंडुलकर याने गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन खासदार आदर्श ग्राम योजनेअंतर्गत एक गाव दत्तक घेण्याचा मानस बोलून दाखविला़

Sachin's visit to the Prime Minister | सचिनने घेतली पंतप्रधानांची भेट

सचिनने घेतली पंतप्रधानांची भेट

नवी दिल्ली : भारताचा महान माजी फलंदाज आणि खासदार सचिन तेंडुलकर याने गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट 
घेऊन खासदार आदर्श ग्राम योजनेअंतर्गत एक गाव दत्तक घेण्याचा मानस बोलून दाखविला़ या वेळी मास्टर ब्लास्टरने स्वच्छ भारत अभियानातील योगदानाबद्दल माहिती दिली़ 
पंतप्रधान मोदी यांनी महात्मा गांधींचा जन्मदीन 2 ऑक्टोबरपासून देशात स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात केली आह़े या अभियानासाठी निवडण्यात आलेल्या 9 विशेष व्यक्तींमध्ये 41 वर्षीय तेंडुलकरचाही समावेश आह़े सचिनने पत्नीसमवेत पंतप्रधान मोदींची भेट घेतली़ या वेळी तो म्हणाला, या अभियानाशी जुळण्यासाठी जास्तीत जास्त लोकांना आवाहन केले आह़े 
या व्यतिरिक्त शाळा आणि महाविद्यालयांमध्ये खेळाचा विकास करण्यासाठी विशेष पुढाकार घेण्याची इच्छा व्यक्त केली़ दरम्यान, सचिन तेंडुलकरने आपल्या मित्रंसह गत आठवडय़ात मुंबईत साफसफाई केली होती़ तेव्हा पंतप्रधान मोदी 
यांनी तेंडुलकरचे कौतुक केले 
होत़े (वृत्तसंस्था) 

 

Web Title: Sachin's visit to the Prime Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.