शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

सचिनचे भाषण गोंधळात गेले राहून, राज्यसभेच्या पिचवर विक्रमादित्याला नाही उघडता आले खाते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 02:00 IST

सचिन तेंडुलकर गुरुवारी प्रथमच राज्यसभेत बोलायला उभा राहिला. पण त्याला बोलताच आले नाही. कारण काय तर राज्यसभेचे कामकाज सुरू होताच अवघ्या १५ मिनिटांत सभागृहाचे कामकाज गदारोळामुळे तहकूब झाले. साहजिकच खेळण्याचा अधिकार (राइट टू प्ले) या विषयावर सचिनचे विचार कोणालाच ऐकायला मिळाले नाहीत.

सुरेश भटेवरा नवी दिल्ली : सचिन तेंडुलकर गुरुवारी प्रथमच राज्यसभेत बोलायला उभा राहिला. पण त्याला बोलताच आले नाही. कारण काय तर राज्यसभेचे कामकाज सुरू होताच अवघ्या १५ मिनिटांत सभागृहाचे कामकाज गदारोळामुळे तहकूब झाले. साहजिकच खेळण्याचा अधिकार (राइट टू प्ले) या विषयावर सचिनचे विचार कोणालाच ऐकायला मिळाले नाहीत.माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या देशभक्तीविषयी संशय व्यक्त करणारे विधान पंतप्रधान मोदींनी केल्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांत सोमवारपासून गदारोळ सुरू आहे. पंतप्रधान मोदींनी आरोपांचे स्पष्टीकरण द्यावे वा निराधार आरोपांबद्दल माजी पंतप्रधानांसह संबंधितांची माफी मागावी असा विरोधकांचा आग्रह आहे. सभापती व्यंकय्या नायडूंनी सुरुवातीला हा अडथळा दूर करण्यासाठी सभागृह नेते अरुण जेटलींवर जबाबदारी सोपवली. मात्र त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही. पंतप्रधानांनी ना स्पष्टीकरण दिले ना माफी मागितली.त्यामुळे राज्यसभेतला गोंधळही थांबलेला नाही. त्यामुळे सचिन तेंडुलकरचे पहिलेवहिले भाषणही वाहून गेले. राज्यसभेवर २0१२ साली नामनियुक्त झाल्यानंतर सभागृहात सचिनचे हे पहिलेच भाषण ठरणार होते. क्रीडा क्षेत्राची स्थिती, आॅलिम्पिक खेळांसाठी देशाची तयारी, भारतीय खेळाडूंच्या गुणवत्तेचे चांगले प्रदर्शन कसे होईल, यासह खेळण्याचा अधिकार या विषयावर बोलण्यासाठी सचिन तयारी करून आला होता.दीर्घ आजार व आर्थिक चणचण असलेले भारतीय हॉकी संघाचे माजी खेळाडू मोहम्मद शाहिद यांचे उदाहरण देत आंतरराष्ट्रीय खेळात चांगले प्रदर्शन करणाºया भारतीय खेळाडूंना केंद्राच्या आरोग्य योजनेचा लाभ मिळावा यासाठी आॅक्टोबरमध्ये सचिनने पंतप्रधान मोदींना एक पत्रही लिहिले होते. मात्र आरोग्य मंत्रालयाने सुविधा देण्यास असमर्थता व्यक्त केली होती, असे समजते.दोघांच्या अनुपस्थितीचीच चर्चा अधिक-राज्यसभेत सचिन तेंडुलकर व अभिनेत्री रेखा यांच्या अनुपस्थितीचा वारंवार उल्लेख झाला आहे. त्या दोघांची सदस्यता रद्द करण्याची मागणीही सभागृहात झाली. त्या दोघांची २0१२ साली निवड झाली. तेव्हापासून आजतागायत संसदीय कामकाजाच्या ३४८ दिवसांत सचिन २३ दिवस तर रेखा १८ दिवस सभागृहात काही काळासाठी उपस्थित राहिले. संसदेबाहेर तेंडुलकरने दत्तक ग्राम योजना आदी उपक्रमात विशेष रस घेतला आहे.

टॅग्स :Sachin Tendulkarसचिन तेंडूलकरRajya Sabhaराज्यसभा