सचिन तेंडुलकरचा ‘भारतरत्न’ परत घ्यावा
By Admin | Updated: June 20, 2015 00:54 IST2015-06-20T00:54:30+5:302015-06-20T00:54:30+5:30
क्रिकेटप्रेमींच्या गळ्यातील ताईत असलेला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्याकडून ‘भारतरत्न’ हा देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार परत घ्यावा, अशी मागणी

सचिन तेंडुलकरचा ‘भारतरत्न’ परत घ्यावा
जबलपूर : क्रिकेटप्रेमींच्या गळ्यातील ताईत असलेला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्याकडून ‘भारतरत्न’ हा देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार परत घ्यावा, अशी मागणी करणारी याचिका मध्यप्रदेश उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. न्यायालयाने गुरुवारी ही याचिका विचारार्थ मंजूर केल्यामुळे सचिन कायद्याच्या डावपेचात अडकला आहे.
भोपाळचे रहिवासी व्ही. के. नस्वा यांनी ही याचिका दाखल केली आहे. सचिन तेंडुलकर एक जगप्रसिद्ध क्रिकेट खेळाडू आहे.
क्रिकेट जगतात त्यांनी अनेक जागतिक विक्रम आपल्या नावावर नोंदवले आहेत. मात्र ते देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराचा व्यावसायिक उत्पादनांच्या जाहिरातींसाठी वापर करीत असून बक्कळ पैसा कमवत आहेत. हे ‘भारतरत्न’ या प्रतिष्ठित व सर्वोच्च पुरस्काराचे पावित्र्य, वारसा व मूल्यांविरुद्ध आहे. त्यामुळे सचिन यांनी नैतिक आधारावर स्वत:हून ‘भारतरत्न’ परत करावा. ते असे करणार नसतील तर केंद्र सरकारने हा सन्मान त्यांच्याकडून परत घ्यावा, अशी मागणी नस्वा यांनी आपल्या याचिकेत केली आहे. नस्वा यांनी न्यायालयात स्वत: युक्तिवाद करीत, आपली बाजू मांडली. (वृत्तसंस्था)