शहरं
Join us  
Trending Stories
1
एक काेटी वाहनांना नाही ‘हाय सिक्युरिटी नंबरप्लेट’! एकूण ६८.२४ लाख चालकांनी दिला प्रतिसाद
2
कसली थंडी..? आता अनुभवा ‘नोव्हेंबर हीट’! मुंबईसह राज्यभरात अवकाळी पावसाचीही शक्यता
3
आजचे राशीभविष्य, ०२ नोव्हेंबर २०२५: हाती पैसा, यश-कीर्ती लाभेल; पण हट्टीपणा सोडावा
4
महिला वर्ल्डकप: आज घडणार इतिहास; प्रथमच जिंकेल भारत किंवा दक्षिण आफ्रिका; उत्सुकता शिगेला
5
कुष्ठरोगाचे निदान झाले रे झाले की, रुग्णनाेंद बंधनकारक; सार्वजनिक आरोग्य विभागाचा निर्णय
6
आयोगाचा सर्व्हर कुणाच्या कार्यालयात? कुणाची नावे काढायची, कुठली टाकायची हा कट सुरू: ठाकरे
7
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभच लाभ, पद-पैसा वाढ; ६ राशींना काहीसा ताप, तुमची रास कोणती?
8
चार हजार ग्राहकांनी वाढवली २२ मेगावॅट क्षमता; २ हजार ४६० औद्योगिक ग्राहकांचाही समावेश
9
मूक आंदोलन करून भाजपने केला पलटवार! ...हा तर मविआचा नवा कट- रवींद्र चव्हाण
10
जय हरी विठ्ठल.. एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
11
दुबार मतदार दिसताच बडवा; मविआ-मनसेचा महाएल्गार! मतदार यादीतील घोळाबाबत मुंबईत निषेध मोर्चा
12
गाव पोटा.. व्यवसाय शेती अन् वालेगावकर दाम्पत्याला मिळाला उपमुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान
13
‘तुमच्या विमानात आज १९८४ मद्रास स्टाईल बॉम्ब अटॅक होणार आहे’; मुंबईत इमर्जन्सी लँडिंग
14
२४ मोबाईल खेचणाऱ्या दोन आरोपींना अटक; आचोळेच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांची कामगिरी
15
ठेकेदारांचे कामबंद, हिवाळी अधिवेशन नागपूर की मुंबईत? बांधकाम खाते संभ्रमात
16
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
17
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
18
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
19
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
20
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार

सचिन पायलट जाणार भाजपात, आई रमा यांनी घडवून आणल्या पडद्यामागील हालचाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2020 06:11 IST

सचिन पायलट यांच्या मातोश्री रमा पायलट यांनी फेब्रुवारीमध्ये नवनिर्वाचित भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतली होती.

- हरिश गुप्तानवी दिल्ली : राजस्थानचे बडतर्फ उपमुख्यमंत्री तथा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष सचिन पायलट हे भाजपात जाणार असल्याचे वृत्त आहे. त्यांनी आज केलेल्या एका ट्विटमधूनही याचे संकेत मिळाले आहेत. त्यांनी आपल्या ट्विटचा शेवट ‘राम राम सा’ या राजस्थानी पारंपरिक अभिवादनाने केला आहे.

सचिन पायलट यांच्या मातोश्री रमा पायलट यांनी फेब्रुवारीमध्ये नवनिर्वाचित भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतली होती. आपल्या मुलाला मुख्यमंत्री करणार असाल तर आपण भाजपात यायला तयार आहोत, असे त्यांनी तेव्हा नड्डा यांना सांगितले होते.काँग्रेसला सत्तेत आणण्यासाठी प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष या नात्याने सचिन पायलट यांनी पाच वर्षे मेहनत घेतली होती. तथापि, ऐनवेळी त्यांना मुख्यमंत्रीपद नाकारण्यात आल्यामुळे रमा पायलट काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावर प्रचंड नाराज झाल्या होत्या. उपमुख्यमंत्रीपदासह प्रदेशाध्यक्षपदही सचिन यांच्याकडे राहील, अशी ग्वाही सोनिया गांधी यांनी दिली होती. तथापि, त्याने रमा यांचे समाधान झाले नव्हते.

सचिन पायलट यांनी पूर्व राजस्थानात मीना-गुज्जर यांचे मनोमीलन घडविल्याने भाजपाला राजस्थानातील सत्ता गमवावी लागली होती. तेथील ४९ पैकी ४२ जागा भाजपाने गमावल्या होत्या. या पार्श्वभूमीवर भाजपाला रमा पायलट यांचा प्रस्ताव लाभदायक होता. तथापि, तेव्हा नड्डा यांनी नुकताच पदभार स्वीकारलेला होता. पक्षांतर्गत चर्चा होणे आवश्यक होते. आरएसएसच्या नेतृत्वालाही विश्वासात घेणे आवश्यक होते. त्यातच २४ मार्च पासून लॉकडाऊन लागले. सर्व राजकीय हालचाली ठप्प झाल्या.

राज्यसभा निवडणुकीत आमदारांना लाच दिल्याच्या आरोपावरून सचिन पायलट यांना राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वाखालील स्पेशल आॅपरेशन ग्रुपने (एसओजी) नोटीस बजावल्यानंतर भाजपा पुन्हा सक्रिय झाली. प्राप्तिकर विभाग आणि अंमलबजावणी संचालनालयाने गेहलोत यांच्या व्यावसायिक मुलाच्या दहा ठिकाणांवर धाडी टाकल्या. आता ही लढाई पायलट आणि गेहलोत यांच्यापुरती मर्यादित न राहता भाजपा आणि गेहलोत-गांधी यांच्यातील लढाई बनली.

टॅग्स :Sachin Pilotसचिन पायलटRajasthanराजस्थान