सचिनने घेतली मोदींची भेट, गाव दत्तक घेण्याची तयारीही दर्शवली
By Admin | Updated: October 16, 2014 17:30 IST2014-10-16T17:28:30+5:302014-10-16T17:30:46+5:30
सचिनने आदर्श ग्राम योजनेंतर्गत एक गाव दत्त घेण्यासोबतच शाळा व महाविद्यालयांमध्ये खेळांच्या विकासासाठी काम करण्याची इच्छाही मोदींकडे व्यक्त केली आहे.

सचिनने घेतली मोदींची भेट, गाव दत्तक घेण्याची तयारीही दर्शवली
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १६ - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानात सहभागी झाल्यानंतर मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरने गुरुवारी मोदींची नवी दिल्लीत भेट घेतली. या भेटीत सचिनने आदर्श ग्राम योजनेंतर्गत एक गाव दत्त घेण्यासोबतच शाळा व महाविद्यालयांमध्ये खेळांच्या विकासासाठी काम करण्याची इच्छाही मोदींकडे व्यक्त केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ अभियानात सहभागी होण्यासाठी सचिन तेंडुलकरला आवाहन दिले होते. पंतप्रधानांच्या आवाहनानंतर सचिनने त्याच्या मित्रांसोबत मुंबईतील रस्त्यावर उतरुन साफसफाईदेखील केली होती. यानंतर सचिन आणि त्याची पत्नी अंजली तेंडुलकर यांनी गुरुवारी दिल्लीत मोदींची भेट घेतली. या भेटीत सचिनने स्वच्छता अभियानासाठी जास्तीत जास्त निंमत्रीत केल्याचे मोदींना आवर्जून सांगितले.