शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

Sabarimala Temple : १० ते ५० वयोगटातील महिलांनी मंदिरात येऊ नये, मुख्य पुजाऱ्यांची विनंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2018 22:26 IST

सबरीमाला मंदिराचे मुख्य पुजारी कंदारू राजीवारू यांनी भाविकांना आवाहन केले आहे.

तिरुवनंतपूरम - सबरीमाला मंदिरामध्ये सर्व वयोगटातील महिलांना प्रवेश द्यावा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतरही केरळमध्ये वाद सुरू आहे. यादरम्यान, सबरीमाला मंदिराचे मुख्य पुजारी कंदारू राजीवारू यांनी १० ते ५० वयोगटातील महिलांनी मंदिराच्या सन्निधानममध्ये येऊ नये, असे आवाहन केले आहे. मात्र महिलांनी मंदिरात प्रवेश केल्यास पूजा बंद करण्याचा पुजाऱ्यांचा विचार असल्याच्या वृत्ताचे त्यांनी खंडन केले आहे. "अयप्पाची मासिक पूजा आणि अनुष्ठान करणे हे आमचे कर्तव्य आणि जबाबदारी आहे. आम्ही आमची परंपरा तोडणार नाही,"असे राजीवारू यांनी सांगितले. महिलांनी मंदिरात प्रवेश केल्यास पुजाऱ्यांकडून मंदिराचे दरवाजे बंद करून पूजा थांबवण्यात येईल, असे वृत्त प्रसारित झाले होते. मात्र राजीवारू यांनी हे वृत्त फेटाळले आहे. ''आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करतो. पण महिला भक्तांनी मंदिरातील परंपरा आणि इतर भक्तांच्या भावनांचा आदर करून मंदिरात येऊ नये, असे आवाहन राजीवारू यांनी केले.  दरम्यान, केरळच्या शबरीमाला डोंगरावरील सुप्रसिद्ध अयप्पा मंदिरात महिला प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात सध्या तणावाचे वातावरण सुरु आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच, येथील निल्लकल, पंपा, एल्वाकुलम, सन्निधनम या भागात कलम 144 नुसार जमावबंदी लागू करण्यात आली आहे.   शबरीमाला संरक्षण समितीने आज गुरूवार 12 तासांच्या बंदची घोषणा केली आहे. भाजपा, आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद आणि अन्य स्थानिक संघटनांनी या बंदला समर्थन दिले आहे. काँग्रेस या बंदमध्ये सहभागी होणार नाही मात्र, राज्यात विरोध प्रदर्शन करणार आहे. महिलांना प्रवेश खुला करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर केरळच्या शबरीमाला डोंगरावरील सुप्रसिद्ध अयप्पा मंदिर महिनाभराच्या धार्मिक विधींसाठी बुधवारी सायंकाळी प्रथमच प्रचंड तणावाच्या वातावरणात उघडले.  मंदिराचे दरवाजे उघडण्यात येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर विरोधकरणाऱ्यांनी बुधवार सकाळपासूनच मंदिर परिसरात जोरदार निदर्शने केली होती.

टॅग्स :Sabarimala Templeसबरीमाला मंदिरKeralaकेरळ