शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Sabarimala Temple : आरएसएस केरळला वॉर झोन बनवतंय, मुख्यमंत्र्यांचा निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2019 14:24 IST

Sabarimala Temple : केरळमधील सुप्रसिद्ध शबरीमला मंदिरातील शतकानुशतके चालत आलेली प्रथा अखेर बुधवारी मोडीत निघाली आहे. शबरीमला मंदिरात बुधवारी पहाटेच्या सुमारास दोन महिलांनी प्रवेश करुन भगवान अय्यप्पांचे दर्शन घेऊन इतिहास घडवला आहे. पण यानंतर राज्यातील परिस्थिती बिघडली आहे.

ठळक मुद्देदोन महिलांचा शबरीमला मंदिरात प्रवेश, निषेधार्थ केरळ बंदची हाक हिंसक आंदोलनाप्रकरणी 5 जणांना अटककेरळच्या मुख्यमंत्र्यांचा आरएसएसवर निशाणा

तिरुवनंतपुरम - केरळमधील सुप्रसिद्ध शबरीमला मंदिरातील शतकानुशतके चालत आलेली प्रथा अखेर बुधवारी मोडीत निघाली आहे. शबरीमला मंदिरात बुधवारी पहाटेच्या सुमारास दोन महिलांनी प्रवेश करुन भगवान अय्यप्पांचे दर्शन घेऊन इतिहास घडवला आहे. पण यानंतर राज्यातील परिस्थिती बिघडली आहे. या महिलांनी मंदिरात प्रवेश केल्याचा विरोध दर्शवण्यासाठी बुधवारी येथे मोठ्या प्रमाणात निदर्शने-आंदोलने करण्यात आली. यादरम्यान, जखमी झालेले 55 वर्षीय चंदन उन्नीथन यांचा मृत्यू झाला. 

हिंसक निदर्शनं सुरूचशबरीमला मंदिरातील महिला प्रवेश घटनेच्या निषेधार्थ गुरुवारी (2 जानेवारी) केरळ बंदची हाक देण्यात आली. या पार्श्वभूमीवर, आजही राज्यात हिंसक आंदोलनं सुरूच आहेत. याप्रकरणी 5 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. या सर्वांवर महिला पोलीस कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्याचा आरोप आहे. दुसरीकडे, सीपीआयएमच्या कार्यकर्त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कोझिकोडेमध्ये आंदोलनकर्त्यांनी दुकानदारांवर हल्ला करत जबरदस्तीनं दुकानं बंद करण्यास भाग पाडले.  

'आरएसएस केरळला वॉर झोन बनवतंय'राज्यात सुरू असलेल्या हिंसक आंदोलनावरुन मुख्यमंत्री पिनरई विजयन यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री विजयन यांनी म्हटलं की, आरएसएसनं केरळला वॉर झोन बनवून ठेवलं आहे. अशा प्रकारच्या हिंसक निदर्शनांना सरकारचा विरोध आहे.. आम्ही केवळ सर्वोच्च न्यायालयानं दिलेला निर्णय लागू करण्याचा निर्णय घेत आहोत. दरम्यान, या हिंसक आंदोलनामध्ये आतापर्यंत सात पोलीस वाहनं, 79 सरकारी बस आणि 39 पोलीस कर्मचाऱ्यांवर निशाणा साधण्यात आल्याची माहितीही त्यांनी यावेळेस दिली. 

कोण होते चंदन उन्नीथन ?चंदन उन्नीथन हे ‘शबरीमला कर्म समिती’ चे कार्यकर्ते होते. शबरीमला मंदिरात महिला प्रवेशाला उन्नीथन विरोध दर्शवत होते. बुधवार येथे CPIM-BJPच्या कार्यकर्त्यांमध्ये  झालेल्या बाचाबाचीदरम्यान उन्नीथन जखमी झाले. यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. पण, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.  

आज कित्येक हिंदुत्ववादी संघटनांनी राज्यात बंदची हाक दिली आहे. अय्यप्पा मंदिरात 10 ते 50 वर्षे वयोगटांतील महिलांना प्रवेश देण्यात यावा, या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाच्या अंमलबजावणीला अय्यप्पा भक्त, भाजपा, काँग्रेस आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने गेल्या अनेक दिवसांपासून तीव्र विरोध चालवला आहे.  याच पार्श्वभूमीवर, बुधवारी राज्य सचिवालयाबाहेर जवळपास 5 तास हिंसक निदर्शनं सुरू होती. यामध्ये माकपा-भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये दगडफेकीची घटना घडली.

अय्यप्पा मंदिरा प्रवेश करणाऱ्या महिला कोण?

कनकदुर्गा (वय 44 वर्ष) आणि बिंदू (वय 42 वर्ष) अशी या महिलाभक्तांची नावे आहेत. पारंपरिक पद्धतीचे काळ कपडे परिधान करुन या महिलांनी बुधवारी पहाटे 3.38 वाजण्याच्या सुमारास अय्यप्पा मंदिरात प्रवेश केला. दर्शनानंतर कनकदुर्गा आणि बिंदू या दोघींना पोलीस संरक्षणात अज्ञात स्थळी नेण्यात आले. बिंदू प्राध्यपिका आणि कोळीवाडा येथील कम्युनिस्ट कार्यकर्त्या असून, त्यांच्या निवासस्थानी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तर कनकदुर्गा यां मल्लपूरम येथे नागरी पुरवठा खात्यात कर्मचारी आहेत.

महिला प्रवेशानंतर मंदिराचे शुद्धीकरण

या महिलांनी मंदिरात प्रवेश केल्यानंतर येथील मुख्य पुजाऱ्यानं सर्व भक्तांना बाहेर काढले आणि शुद्धीकरणासाठी मंदिर एक तासभर बंद ठेवले. या पुजाऱ्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्रावणकोर देवस्थान मंडळाने म्हटले आहे.

620 किमी लांबीची महिला साखळी

या महिलांनी यापूर्वीही मंदिरात जाण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यांना अडवण्यात आले होते. संतप्त भक्तांच्या निदर्शनांमुळे न्यायालयाचा निकाल अंमलात येऊ शकला नव्हता. दर्शनासाठी आलेल्या महिलांना भक्तींनी पिटाळून लावले होते. या पार्श्वभूमीवर, लैंगिक समानता आणि प्रागतिक मूल्यांच्या रक्षणासाठी केरळमध्ये मंगळवारी 620 किमी लांबीची महिला साखळी गुंफण्यात आली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी महिलांनी अय्यप्पा मंदिरातील प्रवेशबंदी झुगारुन दिली. 

 

 

टॅग्स :Sabarimala Templeशबरीमला मंदिरRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ