शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

सबरीमाला : महिला प्रवेश  मुद्यावरून राजकारण, डावे पक्ष हिंदूविरोधी; भाजप, काँग्रेसची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2021 07:31 IST

सबरीमाला देवस्थानात सर्व वयोगटातील महिलांना प्रवेश देण्याच्या निर्णयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचा जो प्रयत्न केरळ सरकारने केला, त्याला विरोध झाला होता. 

मलप्पुरम : विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत सबरीमाला देवस्थानात महिलांना प्रवेश देण्याचे प्रकरण विरोधकांनी लावून धरले आहे. राज्यातील डाव्या आघाडीचे सरकार हिंदू समाजाचा अपमान करीत  असल्याची टीका भाजप व काँग्रेसने केली आहे. सबरीमाला देवस्थानात सर्व वयोगटातील महिलांना प्रवेश देण्याच्या निर्णयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचा जो प्रयत्न केरळ सरकारने केला, त्याला विरोध झाला होता. केरळचे देवस्थानमंत्री के. सुरेंद्रन यांनी आता म्हटले आहे की, हे प्रकरण हाताळताना आमच्याकडून चूक झाली. पण मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी म्हणाले की, सबरीमाला प्रकरणी पक्षाची भूमिका कायम आहे, महिलांनाही समान हक्क असायला हवेत. सर्व वयोगटाच्या महिलांना मंदिरात प्रवेश मिळायला हवा. त्यांच्या या वक्तव्यानंतर भाजप व काँग्रेसने डाव्या आघाडीच्या सरकारवर हल्ला चढवला. माकप भक्तांचा अपमान करीत असल्याची टीका काँग्रेसचे नेते रमेश चेन्नीतला यांनी केली. येचुरी यांच्या वक्तव्याने मुख्यमंत्री पिनराई विजयन यांचा खरा चेहरा समोर आला असून, हिंदू भक्तांचा राज्यात अपमान केला जात आहे, असा आरोप भाजपनेही केला.  मुख्यमंत्री विजयन म्हणाले की, मंदिरात सर्व वयाेगटांतील महिलांना प्रवेश देण्याबाबतची पुनर्विचार याचिका न्यायालयात असून, तिचा निर्णय देईल, त्यावेळी सरकार सर्व पक्षांशी विचारविनिमय करेल.

सबरीमाला मंदिरात सर्व वयोगटांच्या महिलांना प्रवेश हा निवडणुकीचा विषय असू शकत नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या वेळीही भाजप व काँग्रेसने हा मुद्दा ताणून धरला; पण जनतेने मात्र आम्हालाच मते दिली.- पिनराई विजयन, मुख्यमंत्री   

टॅग्स :Kerala Assembly Elections 2021केरळ विधानसभा निवडणूक २०२१Sabarimala Templeशबरीमला मंदिरWomenमहिलाPoliticsराजकारण