सार्क राष्ट्रांमध्ये ऊर्जा क्षेत्रत सहकार्य वाढविणार
By Admin | Updated: September 16, 2014 00:47 IST2014-09-16T00:47:09+5:302014-09-16T00:47:09+5:30
देशांच्या ऊर्जामंत्र्यांची परिषद आयोजित करण्याचा प्रस्ताव असल्याचे केंद्रीय वीज, कोळसा व अपारंपरिक ऊर्जामंत्री पीयूष गोयल यांनी येथे सांगितले.

सार्क राष्ट्रांमध्ये ऊर्जा क्षेत्रत सहकार्य वाढविणार
नवी दिल्ली : ‘सार्क’ संघटनेच्या माध्यमातून दक्षिण आशियातील देशांमध्ये ऊर्जा क्षेत्रत सहकार्य वाढविण्यासाठी संबंधित देशांच्या ऊर्जामंत्र्यांची परिषद आयोजित करण्याचा प्रस्ताव असल्याचे केंद्रीय वीज, कोळसा व अपारंपरिक ऊर्जामंत्री पीयूष गोयल यांनी येथे सांगितले. दक्षिण आशियातील देशांमध्ये प्रादेशिक सहकार्य वाढविण्याचे काम सार्क संघटना करते.
पंतप्रधानपदाच्या शपथविधी कार्यक्रमापासूनच नरेंद्र मोदी यांनी शेजारी राष्ट्रांशी सहकार्याचे नवे पर्व सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याचे गोयल यांनी एका परिषदेत सांगितले.
आपारंपरिक ऊर्जा क्षेत्रवर भर देताना गोयल यांनी वीज क्षेत्रत आगामी तीन ते चार वर्षात 1क्क् अब्ज डॉलर्सची गुंतवणूक अपेक्षित असल्याचे सांगितले. ऊर्जा क्षेत्र अधिक कार्यक्षम आणि किफायतशीर बनविण्याचा सरकारचा संकल्प असल्याचे प्रतिपादन गोयल
यांनी केले. (लोकमत न्यूज नेटवर्क)