एस.ए. क्रिकेटर्स चिंबल अजिंक्य
By Admin | Updated: June 2, 2015 00:03 IST2015-06-02T00:03:49+5:302015-06-02T00:03:49+5:30
अस्नोडा क्रिकेट क्लब टी-२० स्पर्धा

एस.ए. क्रिकेटर्स चिंबल अजिंक्य
अ ्नोडा क्रिकेट क्लब टी-२० स्पर्धापणजी : अंतिम सामन्यात यजमान अस्नोडा क्रिकेट क्लबचा २० धावांनी पराभव करीत चिंबल येथील एस.ए. क्रिकेटर्सने अस्नोडा क्रिकेट क्लब आयोजित ६व्या अखिल गोवा टष्ट्वेंटी-२० सीझनबॉल क्रिकेट स्पर्धेचे अजिंक्यपद पटकाविले.अडवलपाल मैदानावर खेळविण्यात आलेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना एस.ए. क्रिकेटर्सने १७ षट्कांत ६ गडी गमावत १७६ अशी धावसंख्या उभारली. सिद्धेश अरोराने ३५, दत्तेश प्रियोळकरने २४ तर शिशिर दिवकरने २४ धावांचे योगदान दिले. अस्नोडातर्फे धोंडू तुळस्करने २० धावांत २ तर संजय नागवेकरने ३७ धावांत २ गडी बाद केले.प्रत्युत्तरात खेळताना अस्नोडा क्रिकेट क्लबला ९ गाड्यांच्या मोबदल्यात १५६ धावांपर्यंत मजल मारता आली. त्यांच्या सचिन राऊतने सवार्धिक ५५, तिमराज मुगविरने २३, संजय नागवेकरने २३ तर सर्वेश सिनारीने १३ धावा जोडल्या. एस.ए. क्रिकेटर्सतर्फे सूरज सावळने १५ धावांत ३, टेकबहादुरने २२ धावांत १ तर सीताराम राऊतने २४ धावांत १ गडी बाद केला.मालिकावीर दत्तेश प्रियोळकर (एस.ए.क्रिकेटर्स), उत्कृष्ट फलंदाज-सिद्धेश अरोरा (एस.ए. क्रिकेटर्स), उत्कृष्ट गोलंदाज-परेश नाईक (अस्नोडा क्रिकेट क्लब) व उत्कृष्ट झेल-अरुण कोले (शिव साई चोपडे) यांची वैयक्तीक बक्षिसांसाठी निवड करण्यात आली.बक्षीस वितरण सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून माजी पर्यटनमंत्री नीळकंठ हलर्णकर यांची उपस्थित होती. त्यांच्या हस्ते अस्नोड्याचे पंच ज्ञानेश्वरकळंगुटकर, माजी सरपंच संतोष घाटवळ, सर्व्हेश सिनारी व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत विजेत्यांना बक्षिसे प्रदान करण्यात आली.ओळ - माजी पर्यटनमंत्री निळकंठ हळर्णकर व इतर मान्यवरांसमवेत विजेता एस.ए. क्रिकेटर्स चिंबल संघ.