एस. श्रीशांत भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढविण्याची शक्यता
By Admin | Updated: March 23, 2016 09:30 IST2016-03-22T17:44:39+5:302016-03-23T09:30:46+5:30
दक्षिण भारतात कमळ फुलविण्याच्या भाजपच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. त्यासाठी या भागातील अनेक चर्चेतील चेहरे समोर आणण्याच्या तयारीत भाजप आहेत.

एस. श्रीशांत भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढविण्याची शक्यता
>ऑनलाइन लोकमत
कोची, दि. २२ - दक्षिण भारतात कमळ फुलविण्याच्या भाजपच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. त्यासाठी या भागातील अनेक चर्चेतील चेहरे समोर आणण्याच्या तयारीत भाजप आहेत. केरळ विधानसभा निवडणूक १६ मे ला होणार असून या निवडणूकीच्या रिंगणात भाजप क्रिकेटर एस. श्रीशांतला उमेदवार म्हणून उतरविण्याची शक्यता आहे.
एस. श्रीशांतने याबाबत अद्याप निर्णय घेतला नसून त्याने उद्या निर्णय घेणार असल्याचे सांगितले आहे. तसेच त्याने ट्विटसुद्धा केले आहे.
केरऴमधील थ्रिप्पुनीथुरा मतदार संघातून निवडणूक लढविण्यासाठी एका वरिष्ठ भाजपच्या नेत्यांचा फोन आल्याचे एस. श्रीशांतच्या घरातील एका सदस्याने सांगितले. तसेच, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा केरळच्या दौ-यावर येतील, त्यावेळी एस. श्रीशांत त्यांची भेट घेणार असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, याबाबत केरळचे प्रदेशाध्यक्ष कुम्मानम राजशेखरन यांनी सांगितले की, अद्याप तरी याबाबत काही पाऊले उचलली नाहीत. मात्र येत्या दोन दिवसांत याबाबत खुलासा करण्यात येईल.