शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या सप्तपदीतील शेवटची फेरी आज; ८ राज्यांत ५७ जागांवर दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
2
LPG Price Cut: महिन्याच्या सुरुवातीलाच खूशखबर, स्वस्त झाला LPG Cylinder; पाहा नवे दर
3
Porsche Car Accident : अल्पवयीन कारचालकाची आई शिवानी अग्रवाल अटकेत; बाळाला वाचवण्यासाठी ब्लड सॅम्पल बदलल्याचा पोलिसांना संशय
4
घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरण: माजी संचालिकेचा सहभाग, पोलिसांचा सत्र न्यायालयात दावा
5
7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! DA नंतर आता ग्रॅच्युइटीत केली वाढ, पाहा डिटेल्स 
6
मंगळाचे स्वराशीत गोचर: ६ राशींना अच्छे दिन, जबरदस्त यश-लाभ; मेहनतीचे योग्य फल, मंगलमय काळ!
7
डाेंबिवली MIDC स्फोट प्रकरण: मलय, स्नेहाला न्यायालयीन कोठडी; अधिकाऱ्यांची होणार चौकशी
8
Panchayat 3 Web Series: प्रधानजींचं घर, पाण्याची टाकी, जाणून घ्या कुठे आहे 'पंचायत'मधलं खरं गाव?
9
४८ तास उलटूनही ‘तो’ पोकलेन चालक बेपत्ता; ब्लॉक कापण्यासाठी डायमंड कटर मागवले
10
थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र अव्वल; केंद्राच्या हवाल्याने उपमुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती
11
आजचे राशीभविष्य - 1 जून 2024 : भिन्नलिंगी व्यक्तीचा तुमच्या जीवनावर पगडा असेल, मान-सन्मान मिळेल
12
‘मेगा’ हालसाठी तयार राहा! ‘मरे’वर आज ५३४ लोकल फेऱ्या रद्द! दोन परीक्षाही पुढे ढकलल्या
13
कोस्टल रोड सुरक्षित, बोगद्यात झिरपणारे पाणी रोखण्यात यश- मुंबई महानगरपालिका
14
खूशखबर! जीडीपी वाढला ८.२ टक्क्यांनी; भारताचा दर हा जगात सर्वाधिक वाढीचा!
15
बँकांतील सायबर गुन्ह्यांमध्ये ३०० टक्के वाढ; ३६ हजार ग्राहकांना ३०,००० कोटींचा आर्थिक फटका
16
विठ्ठल मंदिरी सापडले तळघर अन् ६ मूर्ती; साेळाव्या शतकातील मूर्ती असल्याचा अंदाज
17
सर्वसामान्यांची लाल परी झाली ७६ वर्षांची! वर्धापन दिनानिमित्त एसटी स्थानके रांगोळीने सजणार
18
२० मेडिकल कॉलेजांना आयोगाने ठोठावला दंड; त्रुटी दूर करण्यासाठी दिला २ महिन्यांचा अवधी
19
प्रसारमाध्यमांकडे तक्रार केल्याने विद्यार्थ्यांवर कारवाई; विद्यापीठाची प्रतिमा मलिन केल्याचा ठपका
20
मुंबई विद्यापीठाचा बीए सत्र सहाचा निकाल ४९ टक्के; यंदा ४८०६ विद्यार्थी झाले अनुत्तीर्ण

'लवकरच PoK भारतात येणार', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचे सूचक वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2024 5:32 PM

S jaishankar on PoK : 'जम्मू आणि काश्मीरमधील विकास पाहून पीओकेचे लोक भारताकडे आकर्षित झाले आहेत.'

S Jaishankar on PoK : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यानंतर आता परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनीही पाकव्याप्त काश्मीर(POK)बाबत मोठे वक्तव्य केले आहे. 'पाकव्याप्त काश्मीर भारताचा अविभाज्य भाग आहे आणि अखेरीस तो भारतात परत येईल. तेथील जनता आता त्यांच्याच सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरली आहे, असे जयशंकर म्हणाले.

पीओकेतील जनता काश्मीरचा विकास पाहत आहेनाशिकमध्ये आयोजित कार्यक्रमात पीओकेमधील वाढत्या हिंसाचाराबाबत बोलताना जयशंकर म्हणाले की, जम्मू आणि काश्मीरमध्ये गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर होत असलेला विकास पाहून पीओकेचे लोक भारताकडे आकर्षित झाले आहेत. ते इकडचा सकारात्मक बदल पाहून स्वतःला प्रश्न विचारत आहेत की, या गोष्टी खऱ्या आहेत, तर आम्हाला इकडे इतका त्रास का होत आहे? आम्ही असा अत्याचार का स्वीकारत आहोत? 

लोक हिंसाचाराला कंटाळले आहेतपरराष्ट्र मंत्री पुढे म्हणाले की, पीओकेच्या मुझफ्फराबादमध्ये संपूर्ण अराजकता पसरली आहे, स्थानिक लोक हिंसाचाराला कंटाळले आहेत. वाढती महागाई आणि वाढलेल्या वीजबिलामुळे अनेक दिवसांपासून परिसर अशांत आहे. पीओके एक वेगळी श्रेणी असली तरी, तो शेवटी भारताचा भाग आहे  आणि भारतात परत येईल, याबद्दल आमच्या मनात शंका नाही, असेही ते यावेळी म्हणाले.

टॅग्स :S. Jaishankarएस. जयशंकरPOK - pak occupied kashmirपीओकेIndiaभारतJammu Kashmirजम्मू-काश्मीर