शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

प्रद्युम्नच्या हत्येनंतर 10 दिवसांनी सुरू झाली रायन इंटरनॅशनल स्कूल; शाळा उघडण्याच्या निर्णयाला प्रद्युम्नच्या वडिलांचा विरोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2017 13:52 IST

गुरूग्राममधील रायन इंटरनॅशनल स्कूल सोमवारी सकाळी पुन्हा उघडली.

ठळक मुद्दे गुरूग्राममधील रायन इंटरनॅशनल स्कूल सोमवारी सकाळी पुन्हा उघडली.शाळेच्या 7 वर्षीय विद्यार्थी प्रद्युम्न याच्या हत्येनंतर 10 दिवसांनी शाळा पुन्हा सुरू झाली.शाळा सुरू करण्याच्या निर्णयाला प्रद्युम्नचे वडील वरूण ठाकूर यांनी विरोध केला आहे.

गुरूग्राम, दि. 18- गुरूग्राममधील रायन इंटरनॅशनल स्कूल सोमवारी सकाळी पुन्हा उघडली. शाळेच्या 7 वर्षीय विद्यार्थी प्रद्युम्न याच्या हत्येनंतर 10 दिवसांनी शाळा पुन्हा सुरू झाली. पण शाळा सुरू करण्याच्या निर्णयाला प्रद्युम्नचे वडील वरूण ठाकूर यांनी विरोध केला आहे. प्रद्युम्नची हत्या झाल्यानंतर शाळेकडून पुराव्यांशी छेडछाड करण्यात आली, रक्ताचे डाग मिटविण्याचे प्रयत्न करण्यात आले. तरीही शाळा कशी सुरू केली जाऊ शकते? असा सवाल प्रद्युम्नच्या वडिलांनी उपस्थित केला आहे. गुरूग्राम पोलीस ठाण्याचे उपायुक्त विनय प्रताप सिंह सध्या रायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये पोहचले आहेत. 

मुलांमध्ये भीतीचं वातावरणरायन इंटरनॅशनल स्कूल सोमवारी सकाळी सुरू झाली. मुलांनी शाळेत हजेरी लावली. पण शाळेत आलेल्या मुलांमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळतं आहे. शाळेत आल्यानंतर खूप भीती वाटते आहे. पण शाळा पुन्हा सुरू झाली म्हणून यावं लागलं,अशी प्रतिक्रिया मुलांकडून मिळते आहे. मुलांच्या अभ्यासाचं नुकसान होऊ नये, यासाठी त्यांना शाळेत घेऊन आल्याचं पालकांनी सांगितलं आहे. सकाळी शाळेमध्ये आलेली एक मुलगी रडायला लागली आणि भीतीमुळे ती वर्गात बसायला तयार नव्हती. यामुळे तिचे पालक तिला पुन्हा घरी घेऊन गेले. तर काही पालकांनी आज मुलांना शाळेत न पाठवणं पसंत केलं. शाळेतील सुरक्षा व्यवस्था नीट असल्याची खात्री करूनच मुलांना शाळेत पाठवणार असल्याचं त्यांनी सांगितलं. तर शाळेत गेलेली आमची मुलं पुन्हा घरी येईपर्यंत मनात भीतीचं असेल, असं काही पालकांनी सांगितलं.

प्रद्युम्नच्या वडिलांनी व्यक्त केली नाराजीप्रद्युम्नच्या हत्येनंतर दहा दिवसांनी शाळा सुरू केल्याच्या निर्णयावर प्रद्युम्नच्या वडिलांनी नाराजी व्यक्त करत निर्णयाला विरोध केला आहे. जोपर्यंत हत्येचा तपास पूर्ण होत नाही. तोपर्यंत शाळा प्रशासन शाळा कशी सुरू करू शकतं? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. याप्रकरणी वरूण ठाकूर म्हणाले, या संपूर्ण घटनेत शाळेतील काही लोक सहभागी आहेत. जर शाळा पुन्हा सुरू केली तर ती लोक  पुराव्यांशी छेडछाड करण्याची शक्यता आहे. 

कोर्टाने सरकारला पाठवली नोटीससुप्रीम कोर्टाने शाळेतील सुरक्षेच्या मुद्द्यावर केद्र सरकार आणि राज्य सरकारकडून उत्तर मागितलं आहे. कोर्टाने नोटीस जारी करत, शाळांमध्ये सुरक्षेच्या मुद्द्यावर काय पाऊलं उचलली जात आहेत? असा सवाल विचारला आहे. केंद्र आणि राज्य सरकारने तीन आठवड्यात यावर उत्तर देण्याचंही सुप्रीम कोर्टाने म्हंटलं आहे. गुरूग्रामच्या रायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये प्रद्युम्नची हत्या झाल्यानंतर शाळांमधील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. 

नेमकं प्रकरण काय ?गुरूग्रामच्या रायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये 8 सप्टेंबर रोजी दुसरीत शिकणाऱ्या प्रद्युम्नची हत्या झाली. शाळेच्या स्वच्छतागृहात रक्ताच्या थारोळ्यात प्रद्युम्नचा मृतदेह सापडला होता. याप्रकरणी शाळेच्या बसचा कंडक्टर अशोक याच्यासह तीन जणांना पोलिसांनी अटक केली. पोलिसांकडून झालेल्या तपासणीत आरोपी अशोक कुमार याने गुन्ह्याची कबूली दिली. 

टॅग्स :Ryan International Schoolरेयान इंटरनॅशनल स्कूलStudentविद्यार्थी