शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

Russian Ukraine War : शेवटी आईच 'ती'! "डॉक्टरची डिग्री मिळो किंवा न मिळो पण आता मुलाला परत पाठवणार नाही" 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2022 13:09 IST

Russian Ukraine War : प्रशांत सिंह हा विद्यार्थी जेव्हा आपल्या घरी परतला तेव्हा अत्यंत भावूक वातावरण पाहायला मिळालं. मुलगा सुखरुप घरी आल्याचं पाहताच आईचे डोळे पाणावले.

नवी दिल्ली - रशिया आधुनिक शस्त्रे, बॉम्ब आणि क्षेपणास्त्रांनी हल्ले करत आहे. रशिया युक्रेनमध्ये हल्ले करत असून आगामी काळात क्षेपणास्त्र हल्ल्यांची संख्या वाढण्याची भीती आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. युक्रेनमधील सामान्य लोकही रशियन हल्ल्याचे बळी ठरले आहेत. याशिवाय रशिया युक्रेनचे अनेक लष्करी तळ नष्ट करण्याचा दावा करत आहे. याच दरम्यान युक्रेनमध्ये अडकलेले काही भारतीयविद्यार्थी देशात परत आले आहेत. प्रशांत सिंह हा विद्यार्थी जेव्हा आपल्या घरी परतला तेव्हा अत्यंत भावूक वातावरण पाहायला मिळालं. मुलगा सुखरुप घरी आल्याचं पाहताच आईचे डोळे पाणावले. तिने मुलाला घट्ट मिठी मारली. 

"डॉक्टरची डिग्री मिळो किंवा न मिळो पण आता पुन्हा मुलाला परत पाठवणार नाही" असं प्रशांतच्या आईने म्हटलं आहे. मुलाचं हार घालून अत्यंत उत्साहात कुटुंबीयांनी स्वागत केलं. प्रशांतच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, युक्रेनच्या तेरनोपिल शहरात प्रशांत सिंह एमबीबीएस करत होता. युद्ध सुरू झाल्यानंतर तो आपल्या काही मित्रांसोबत पायी चालत रोमानिया बॉर्डरवर पोहोचला. तेथून चार दिवसांनंतर तो आता भारतात परतला आहे. दिल्ली पोहोचल्यानंतर त्याला कारने घरी सोडण्यात आलं. 

"सतत बॉम्बस्फोट आणि गोळीबारात मी कधीच घरी परत जाऊ शकणार नाही असं वाटत होतं पण..."

प्रशांतने परिस्थिती अत्यंत भीषण असून ते दु:ख सांगूच शकत नसल्याचं म्हटलं आहे. तसेच सतत बॉम्बस्फोट आणि गोळीबारात मी कधीच घरी परत जाऊ शकणार नाही असं वाटत होतं पण मोदी सरकारने आम्हाला सर्वांना वाचवलं आहे. त्यामुळे सरकारने आता विमानांची संख्या वाढवून सर्वांना परत आणावं असं आवाहन देखील प्रशांतने केलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. राजस्थानचा एक विद्यार्थी आपल्या घरी सुखरूप परत आला आहे. 'इथेच शिकेन पण आता परदेशात जाणार नाही' असं म्हणत युक्रेनवरून परतलेल्या विद्यार्थ्याने भयंकर अनुभव सांगितला आहे. शिवपाल असं या एमबीबीएस विद्यार्थ्याचं नाव असून तो राजस्थानच्या धौलपूरमध्ये परत आला आहे. मेडिकलचं पुढचं शिक्षण इथेच झालं तर पुन्हा युक्रेनला जाणार नाही असं शिवपालने म्हटलं आहे. 

'इथेच शिकेन पण परदेशात जाणार नाही'; युक्रेनवरून परतलेल्या विद्यार्थ्याने सांगितला भयंकर अनुभव

शिवपाल घरी परतल्यावर त्याच्या घरी अत्यंत आनंदाचं वातावरण आहे. विद्यार्थ्याने दिलेल्या माहितीनुसार, "युक्रेनमध्ये अत्यंत गंभीर परिस्थिती आहे. तिथे सातत्याने हल्ले केले जात आहेत. बॉर्डरपर्यंत पोहोचणं तर खूपच अवघड आहे. 30 किमी पायी चालत बॉर्डरपर्यंत पोहोचलो. अनेक विद्यार्थी अद्यापही तिथेच आहेत. ते भारतात परत येण्याची वाट पाहत आहेत. युद्धाच्या परिस्थिती युक्रेनमध्ये विद्यार्थ्यांना स्थानिक सरकारकडून कोणतीच मदत मिळत नाही. मी सुखरुप घरी परत आल्यामुळे भारत सरकार आणि राजस्थान सरकारचे आभार मानतो. त्यांनी आमची भरपूर मदत केली. "राजस्थान सरकारच्या अधिकाऱ्यांनी आमची खूपच मदत केली. माझ्या घरापर्यंतच्या प्रवासाची जबाबदारी पार पाडली. युक्रेनमध्ये खाण्या-पिण्याची काही व्यवस्था नाही. आम्हाला अनेक खडतर प्रसंगाचा सामना करावा लागला. आम्ही दोन रात्री बॉर्डरवर थांबलो आणि आता तिसऱ्या दिवशी येथे येऊ शकलो. बॉर्डरवर प्रचंड गर्दी आहे" अशी माहिती शिवपालने दिली आहे.

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाIndiaभारतStudentविद्यार्थी