शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
4
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
5
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
6
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
7
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
8
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
9
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
10
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
11
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
12
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
13
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
14
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
15
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
16
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
17
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
18
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
19
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
20
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई

रशियाकडून तातडीने लढाऊ विमानांची खरेदी केली जाणार; मनोज नरवणेंसह हवाई दलाच्या प्रमुखांनी घेतली राजनाथ सिंहांची भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2020 03:38 IST

चीनने नियंत्रण रेषा चार किमीपर्यंत बदलण्याचा कट भारतीय जवानांनी उधळून ड्रॅगनला त्याची जागा दाखवली आहे.

टेकचंद सोनावणे नवी दिल्ली : लष्करप्रमुख मनोज मुकुंद नरवणे यांनी शुक्रवारी उशिरा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली. घुसखोरी सुरूच ठेवण्याचा ड्रॅगनचा कट भारतही उधळून लावण्यास सज्ज असून, काहीही झाले तरी चीनला धडा शिकवण्यावर संरक्षण मंत्रालयात एकमत झाले आहे. आजच्या बैठकीत हवाई दलाचे प्रमुखही या वेळी उपस्थित होते. चीनच्या तुलनेत लष्कर व हवाई दलाच्या क्षमतेची माहिती राजनाथ सिंह यांना दोन्ही प्रमुखांनी दिली. चीनने नियंत्रण रेषा चार किमीपर्यंत बदलण्याचा कट भारतीय जवानांनी उधळून ड्रॅगनला त्याची जागा दाखवली आहे.गलवान खोऱ्यात तैनात अधिकाऱ्यांशी चर्चा करून आलेल्या लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी तेथील स्थितीची सविस्तर माहिती शुक्रवारी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना दिल्यानंतर पुढील रणनीती काय असावी, हे ठरविण्यात आले. त्यानुसार रशियाकडून तातडीने लढाऊ विमानांची खरेदी केली जाणार असून, पुढील पंधरा दिवस प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर हवाई गस्त वाढवली जाईल.>आर्थिक दणकाऊर्जा मंत्रालय चीनला आर्थिक आव्हान देणारे पहिले मंत्रालय ठरले आहे. सौर ऊर्जा उपकरणांच्या सुट्या भागांच्या नियार्तीवर ऊर्जा मंत्रालयाने निर्यात शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यंदा १५ टक्के तर पुढच्या वर्षी ही वाढ किमान ४० टक्क्यांपर्यंत नेली जाईल.भारतीय उद्योजकांना प्रोत्साहन देणे व चीनवरील अवलंबित्व कमी करण्याचा उद्देश त्यामुळे साध्य होईल. केंद्रीय मंत्र आर.के. सिंह यांनी या निर्णयाची घोषणा केली. लोकमतने २२ जून रोजीच या संबधीचे वृत्त प्रसिद्ध केले होते.

टॅग्स :fighter jetलढाऊ विमानchinaचीनIndiaभारत