रशिया भारतात 12 अणुभट्टय़ा उभारणार
By Admin | Updated: December 12, 2014 02:37 IST2014-12-12T02:37:47+5:302014-12-12T02:37:47+5:30
जुना मित्र असलेल्या रशियासोबत गुरुवारी 2क् करार करीत भारताने मैत्रीचे नवे पर्व सुरू केले आहे.

रशिया भारतात 12 अणुभट्टय़ा उभारणार
मैत्रीचे नवे पर्व : दोन देशांमध्ये 2क् महत्त्वपूर्ण करार, अत्याधुनिक हेलिकॉप्टर्सचे उत्पादन, भावी तंत्रज्ञानाबाबत व्यापक संशोधन
नवी दिल्ली : जुना मित्र असलेल्या रशियासोबत गुरुवारी 2क् करार करीत भारताने मैत्रीचे नवे पर्व सुरू केले आहे. तेल, गॅस, संरक्षण, गुंतवणूक तसेच सामरिक भागीदारीच्या महत्त्वाच्या क्षेत्रंमध्ये दोन्ही देशांनी संबंध आणखी दृढ करण्याकडे पाऊल टाकले आहे. पुढील 2क् वर्षात म्हणजे 2क्35 र्पयत रशिया भारतात किमान 12 अणुभट्टय़ा उभारणार असून या देशाने अत्याधुनिक हेलिकॉप्टर्सच्या उत्पादनासाठीही होकार कळविला आहे.
रशियाचे भारतभेटीवर आलेले अध्यक्ष व्लादीमीर पुतीन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे शिखर बैठकीत द्विपक्षीय संबंध नव्या उंचीवर नेतानाच नव्या अणू ऊर्जा सहकार्यावर भर देत नवा दृष्टिकोन अधोरेखित केला आहे. पुतीन यांच्यासोबत पत्रकार परिषदेत बोलताना मोदींनी रशिया हा ‘भारताचा शक्तीस्तंभ’ असल्याचा उल्लेख केला. अनेक पर्याय खुले असले तरी रशिया हा भारताचा सर्वात महत्त्वाचा संरक्षण भागीदार म्हणून कायम राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पुतीन यांच्यासोबत मी नव्या संरक्षण प्रकल्पांवर चर्चा केली आहे. भारताने ‘मेक इन इंडिया’चा नारा दिल्याचे पाहता देशाच्या प्राधान्यक्रमाशी आम्ही संरक्षण संबंधांना जोडू इच्छितो. जगातील अत्याधुनिक हेलिकॉप्टरचे उत्पादन करण्यासाठी रशियाने पूर्ण सहकार्य देऊ केल्याने मला आनंद झाला आहे, असे मोदींनी पुतीन यांच्यासोबतच्या बैठकीनंतर स्पष्ट केले.
(लोकमत न्यूज नेटवर्क)
नरेंद्र मोदी
4पुतिन यांनी माङया विनंतीला अतिशय सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. संरक्षण सहकार्यासंबंधी करार महत्त्वपूर्ण आहेत. आमच्याकडे अनेक पर्याय उपलब्ध असले तरी रशियाचे सर्वात महत्त्वाचा संरक्षण भागीदार म्हणून असलेले स्थान कायम राहील.
व्लादीमीर पुतिन
4मोदींसोबत ठोस चर्चा झाली असून रशिया संयुक्त उच्च तंत्रज्ञान प्रकल्पांना मदत करेल. भारताला नागरी वाहतुकीसाठी विमान पुरविण्यासह मोबाईल दळणवळणासाठी भारतीय सेवादात्यांशी कराराबाबत चर्चेत भर देण्यात आला आहे.
उभय देशात नैसर्गिक वायूंच्या पुरवठय़ासह झालेले इतर काही करार
4 हायड्रोकार्बनचे उत्पादन आणि खनिजसाठय़ांच्या शोधासाठी संयुक्त सहकार्य
4 दीर्घ काळासाठी नैसर्गिक वायूंचा पुरवठा,
4 हायड्रोकार्बन पाईपलाईनचा संयुक्त अभ्यास.
4 संरक्षण यंत्रणोचे डिझायनिंग आणि विकासाच्या पुढील टप्प्याकडे वाटचाल.
4 भविष्यातील तंत्रद्यानाबाबत व्यापक संशोधन.
4 नियमित संयुक्त लष्करी कवायती, परस्परांच्या सेवासंस्थांमध्ये प्रशिक्षण सहकार्य,
4 सशस्त्र दलांमधील सल्लामसलतीला संस्थात्मक रूप आदी विविध क्षेत्रतील 2क् महत्त्वपूर्ण करारावर स्वाक्षरी झाल्या.
4दोन्ही देशांनी अणू सहकार्याबाबत सामरिक भागीदारीसंबंधी दृष्टिकोन(स्ट्रॅटेजिक व्हिजन डॉक्युमेंट) स्पष्ट करणारे दस्तऐवज जारी केले. सहकार्यातून उभारल्या जाणा:या अणू ऊर्जा प्रकल्पांची तातडीने अंमलबजावणी करण्याचा उल्लेख त्यात आहे.
42क्क्8 च्या करारानुसार येत्या दोन दशकांमध्ये किमान 12 अणूभट्टयांचे काम पूर्ण करून त्या कार्यान्वित करण्यावर भर दिला जाईल.