शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

Russia Ukraine War: युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी सोनू सूदचा पुढाकार, म्हणाला, जिथे आहात तिथे राहा, लवकरच पोहोचेल मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2022 15:25 IST

Indian Students In Ukraine: Sonu Soodची संस्था सूद चॅरिटेबल ट्रस्ट युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी पुढे आली आहे. या संस्थेने भारताच्या युक्रेनमधील दुतावासाशी संपर्क प्रस्थापित करून भारतीय विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. (Russia Ukraine War)

चंदिगड - कोरोनाकाळात देशाच्या विविध भागात अडकलेल्या श्रमिकांसाठी अभिनेता सोनू सूद हा देवदुतासारखा धावून गेला होता. आता सोनू सूदची संस्था सूद चॅरिटेबल ट्रस्ट युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी पुढे आली आहे. या संस्थेने भारताच्या युक्रेनमधील दुतावासाशी संपर्क प्रस्थापित करून भारतीय विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

प्रसारमाध्यमांमध्ये येत असलेल्या वृत्तानुसार  युक्रेनमध्ये अडकलेल्या पंजाबसह भारतातील विविध भागातील विद्यार्थ्यांना सोनू सूदने आवाहन केले आहे. त्यात त्याने म्हटले आहे की, विद्यार्थ्यांनी युक्रेनमध्ये युद्धस्थळी जिथे असतील तिथेच राहावे. म्हणजे त्यांना सुखरूप बाहेर काढता येईल. जर विद्यार्थी एकाच ठिकाणी राहिले तर भारतीय दुतावासाला त्यांच्याशी संपर्क साधणे सोपे होईल, असे सोनू सूदने सांगितले. सोनू सूदने विद्यार्थ्यांना सांगितले की, भारतीय दुतावास विद्यार्थ्यांचा डेटा घेऊन त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे.

युक्रेनमध्ये निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीदरम्यान, सोनू सूद विद्यार्थ्यांच्या मदतीला धावून आला आहे. युक्रेनहून परतलेले विद्यार्थी त्यांना सोनू सूद आणि त्याच्या टीमकडून कशाप्रकारे मदत मिळाली, हे सांगत आहेत. दरम्यान, सोनूने त्याच्या सोशल मीडिया पोस्टवर लिहिले की, युक्रेनमध्ये भारतीय विद्यार्थ्यांसाठी खूप कठीण काळ आहे. तसेच कदाचित हे माझ्यासाठी आतापर्यंतचे सर्वात कठीण आव्हान आहे.

दरम्यान, युक्रेनमध्ये काही भारतीय विद्यार्थ्यांना मारहाण झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. एका भारतीय विद्यार्थिनीने सांगितले की, ते सात दिवस खारकिव्हमध्ये बंकरमध्ये होते. तिथून ते १४ किमी चालून रेल्वे स्टेशनवर गेले तेव्हा युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी त्यांना तिथून हाकलून लावले. त्यानंतर ३० किमी लांब जाऊन एका बंकरमध्ये आश्रय घेतला. 

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाStudentविद्यार्थीSonu Soodसोनू सूद