शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
2
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
3
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
4
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
5
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
6
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
7
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
8
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
9
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
10
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
11
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
12
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
13
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
14
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
15
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
16
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
17
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
18
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
19
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
20
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!

Russia-Ukraine War: 'भारत माता की... म्हणताच 'जय'घोष झाला, मोदींचे नाव घेताच..." माजी IAS अधिकाऱ्याची टिप्पणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2022 13:23 IST

समाजमाध्यमांवर व्हायरल झालेल्या व्हिडिओवरून माजी आयएएस अधिकारी सूर्य प्रताप सिंह यांनी केली खोचक टिप्पणी....

नवी दिल्ली - रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे (Russia-Ukraine War) हजारो भारतीय युक्रेनमध्ये अडकले आहेत. त्यांना परत आणण्यासाठी केंद्र सरकारने 'ऑपरेशन गंगा'(Operation Ganga) सुरू केले आहे. या अंतर्गत आतापर्यंत हजारो भारतीयांना परत आणले जात आहे. त्यासाठी, युक्रेनशेजारील राष्ट्रांमध्ये भारताचे 4 केंद्रीयमंत्री पोहोचले असून ते भारतीयांना धीर देत आहेत. तर वायूसेनेच्या विमानातूनही देशवापसी सुरू आहे. या देशवापसी दरम्यान युक्रेनमधील भारतीय विद्यार्थ्यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

समाजमाध्यमांवर व्हायरल झालेल्या व्हिडिओत भारतीय वायूदलाच्या विमानात बसलले मायदेशी रवाना होण्यासाठी युक्रेनजवळील राष्ट्रांतून भारतीय विद्यार्थी, नागरिक दिसत आहेत. यावेळी, व्हिडिओमध्ये विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत असून थकवाही जाणवत आहेत. त्यातच, माईकमध्ये भारत माता की... असा आवाज येताच विद्यार्थी मोठ्या जोशाने जय... असा प्रतिसाद देताना दिसून येतात. मात्र, माननीय मोदीजी झिंदाबाद.. माननीय मोदीजी झिंदाबाद... म्हणताना या विद्यार्थ्यांचा आवाज कमी झाल्याचे दिसून येते. त्यावर माजी आयएएस अधिकाऱ्याने खोचक टिप्पणी केली आहे.

मोदींचा जयजयकार करताना विद्यार्थी गप्प राहिल्याचे सूर्य प्रताप सिंग यांनी म्हटले आहे. तर, व्हिडिओतही मोदींचा जयजयकार करताना विद्यार्थ्यांचा जोशपूर्ण आवाज नसल्याचे स्पष्ट ऐकून येत आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

'ऑपरेशन गंगा'टीमचे काम सुरू

केंद्र सरकारने 'ऑपरेशन गंगा' अंतर्गत 80 उड्डाणे तैनात केली आहेत. या मिशनवर देखरेख ठेवण्यासाठी दोन डझनहून अधिक मंत्र्यांची नियुक्ती केली आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांसाठी सरकारने बचाव कार्याला गती दिली आहे. एएनआयच्या वृत्तानुसार, अधिकाधिक भारतीयांना आणण्यासाठी सर्व फ्लाइट्सच्या फेऱ्याही वाढवण्यात आल्या आहेत. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी 10 मार्चपर्यंत एकूण 80 उड्डाणे तैनात करण्याचे नियोजन आहे. ही उड्डाणे एअर इंडिया, एअर इंडिया एक्सप्रेस, इंडिगो, स्पाइस जेट, विस्तारा, गो एअर आणि एअर फोर्सची आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रोमानियाची राजधानी बुखारेस्ट येथून 35 विमाने निघण्याचे नियोजन करण्यात आले असून त्यात एअर इंडियाच्या 14, एअर इंडिया एक्स्प्रेसची 8, इंडिगोची 7, स्पाइसजेटची 1, विस्ताराची 3 आणि भारतीय हवाई दलाची 2 उड्डाणे आहेत.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीairforceहवाईदलRussia Ukrainयुक्रेन आणि रशियाStudentविद्यार्थी