शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

Russia-Ukraine: पीएम नरेंद्र मोदींची युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांशी फोनवर चर्चा; म्हणाले-लवकरात लवकर युद्ध थांबवा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2022 20:54 IST

Russia-Ukraine: यूक्रेन-रशिया यांच्यात सुरू असलेल्या युद्धादरम्यान नरेंद्र मोदी यांनी वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्याशी फोनवर चर्चा केली.

Russia-Ukraine: गेल्या अनेक महिन्यांपासून युक्रेन आणि रशियामध्ये युद्ध सुरू आहे. हे युद्ध थांबवण्याचे अनेक देशांनी प्रयत्न केले, पण युद्ध थांबले नाही. यातच आता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की (volodymyr  Zelenskyy ) यांच्याशी फोनवर चर्चा केली आहे. या चर्चेत पंतप्रधान मोदींनी झेलेन्स्की यांना हे युद्ध लवकरात लवकर संपवण्याचे आवाहन केले.

फोनवरील संभाषणादरम्यान दोन्ही नेत्यांनी युक्रेनमध्ये सुरू असलेल्या संघर्षावर चर्चा केली. यावेळी पंतप्रधान मोदींनी झेलेन्स्की यांना सांगितले की, 'कोणत्याही संघर्षावर लष्करी तोडगा असू शकत नाही. संवादाच्या आधारे लवकरात लवकर वैर संपवा आणि युद्ध थांबवा.' यावेळी मोदींनी भारत युक्रेनसह सर्व आण्विक प्रतिष्ठानांच्या सुरक्षेला महत्त्व देतो, यावर भर दिला. यावेळी त्यांनी अण्वस्त्राच्या धोक्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. सार्वजनिक आरोग्य आणि पर्यावरणावर त्याचे दूरगामी आणि घातक परिणाम होऊ शकतात, असेही मोदी म्हणाले. तसेच, भारत शांततेसाठी केलेल्या प्रयत्नात योगदान देण्यासाठी पूर्णपणे तयार आहे, असेही म्हटले. याशिवाय मोदींनी, संयुक्त राष्ट्रांचे नियम, आंतरराष्ट्रीय कायदा, सर्व देशांचे सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेचा आदर करण्याच्या महत्त्वाचाही पुनरुच्चार केला.

मोदींनी पुतीन यांच्याशी चर्चा केलीनुकत्याच झालेल्या SCO शिखर परिषदेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी युक्रेन संघर्षावर चर्चा केली होती. आजचे युग युद्धाचे नाही, असे पीएम मोदींनी पुतीन यांना सांगितले होते.

अणु प्रकल्प प्रमुखाचे अपहरण युक्रेन आणि रशियामध्ये गेल्या 7 महिन्यांपासून युद्ध सुरू आहे. नुकतेच युक्रेनच्या अणु प्रकल्प प्रमुखाचे रशियन सैनिकांनी अपहरण केले होते. झापोरिझिया न्यूक्लियर पॉवर प्लांटचे महासंचालक इहोर मुराशोव्ह यांचे रशियन सैनिकांनी अपहरण केले होते. युक्रेनियन आण्विक कंपनी एनरगोटमच्या म्हणण्यानुसार, रशियन सैन्याने मुराशोव्हची कार अडवली आणि त्याच्या डोळ्यावर पट्टी बांधून नेले. कंपनीचे अध्यक्ष पेट्रो कोटिन म्हणाले की, मुराशोव्हच्या अपहरणामुळे अणुऊर्जा प्रकल्पाला धोका निर्माण होईल. 

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाNarendra Modiनरेंद्र मोदीVladimir Putinव्लादिमीर पुतिन