शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
2
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
3
रशियन नोकऱ्या स्वीकारू नका; जीवावर बेतू शकतं... परराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना थेट इशारा
4
ना चीनला पळाले, ना दुबईत गेले; 'या' सीक्रेट जागेवर लपलेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली!
5
iPhone 17 Series:'फोल्ड करून दाखवा', आयफोन १७ सिरीज लाँच होताच सॅमसंगने अ‍ॅपलची खिल्ली उडवली
6
"घाई काय आहे, अजिबात नाही"; भारत-पाक सामन्यावर सुप्रीम कोर्टाने दिला तीन वाक्यात निकाल
7
एफडी विसरा... पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत ५.५५ लाख रुपयांचा फिक्स परतावा; दरमहा मिळेल व्याज
8
Navya Malik : आधी मैत्री, मग ग्राहक बनवायची; नेत्यांच्या मुलांना केलं वेडं, ड्रग्ज क्वीनने ८५० श्रीमंतांना लावलं व्यसन
9
मराठा आंदोलनानंतर आता ओबीसींचा मोर्चा मुंबईत धडकणार; तारीख ठरली
10
फ्रान्समध्ये सरकारविरोधात लाखो लोक रस्त्यावर का उतरले? चार कारणे समजून घ्या
11
अवघ्या १५ दिवसांच्या बाळाला फ्रीजमध्ये ठेवून झोपली आई; कारण समजताच कुटुंबीय हादरले!
12
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
13
संतोष देशमुख हत्या खटल्याची सुनावणी लांबविण्याचा प्रयत्न; विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचा न्यायालयात आरोप
14
भारतातून पळालेल्या झाकीर नाईकला झाला एड्स? आता मलेशियामधून समोर आली अशी माहिती
15
IND vs UAE: अभिषेक शर्माची रेकॉर्ड बूकमध्ये नोंद, 'अशी' कामगिरी करणारा चौथा भारतीय
16
हृदयद्रावक! शाळेत खेळता खेळता श्वास थांबला; ११ वर्षांच्या मुलीचा कार्डिएक अरेस्टने मृत्यू
17
मंगळावर खरंच जीवसृष्टी होती? NASA रोव्हरने शोधून काढली अशी गोष्ट, तुम्हीही व्हाल अवाक्
18
दोन iPhone 17 च्या किंमतीत मिळू शकते एक कार, इतक्या पैशांत सामान्य व्यक्ती काय काय खरेदी करू शकते?
19
लॅरी एलिसन यांनी मस्क यांना टाकलं मागे! बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; काय करतात व्यवसाय?
20
कोण आहेत अबिदुर चौधरी? ज्यांनी डिझाईन केला Apple चा सर्वात स्लीम iPhone 17 Air

रशिया-युक्रेन, इस्रायल-इराण, क्वाड अन् ब्रिक्स; भारताचे सर्वांशी सलोख्याचे संबंध- एस जयशंकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2025 21:41 IST

भारताच्या परराष्ट्र धोरणाबाबत केंद्रीय मंत्री एस जयशंकर यांनी महत्वाची माहिती दिली.

S. Jainshankar : सध्या जगभरात अस्थिरतेचे वातावरण पाहायला मिळत आहे. काही देशांमद्ये थेट युद्ध सुरू आहे, तर काही देशांमध्ये युद्धाची परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा कठीण काळात भारताने सर्व देशांशी चांगले संबंध ठेवून, स्वतःला मजबूत स्थितीत ठेवले आहे. दरम्यान, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी भारताची डिप्लोमसी आणि इतर देशांशी असलेल्या संबंधांवर महत्वाची प्रतिक्रिया दिली.

बिझनेस टुडेचा एका कार्यक्रमात बोलताना जयशंकर यांनी भारताची आर्थिक धोरणे आणि जगाचा बदलता मूड, व्यवसाय, राजकीय परिस्थिती आणि आव्हानांवर स्पष्टपणे भाष्य केले. ते म्हणाले की, सध्याच्या भू-राजकीय गोंधळाच्या काळात भारत अशा काही देशांपैकी एक आहे, जो युक्रेन आणि रशिया, तसेच इस्रायल आणि इराण या दोन्ही देशांशी संवाद साधू शकतो. 'सबका साथ, सबका विकास' हा मंत्र परराष्ट्र धोरणालाही लागू होतो. आजच्या ध्रुवीकरणाच्या युगात रशिया आणि युक्रेन, इस्रायल आणि इराण, क्वाड आणि ब्रिक्स या देशांशी जोडले जाऊ शकणाऱ्या काही देशांपैकी भारत आहे.

सबका साथ, सबका विकास...जयशंकर पुढे म्हणतात, 'सबका साथ, सबका विकास' ही घोषणा परराष्ट्र धोरणातही लागू होते. पाश्चात्य आणि युरोपीय देशांप्रमाणे भारताने युक्रेन-रशिया युद्धात कोणत्याही बाजूचे समर्थन केले नाही आणि नेहमीच शांततेचा पुरस्कार केला आहे. भारताची भूमिका नेहमीच शांततेसाठी आहे. 2023 मध्ये इस्रायलवर हमासच्या अचानक हल्ल्यामुळे निर्माण झालेल्या मध्यपूर्वेतील संघर्षांदरम्यान भारताने इराण आणि इस्रायलशी आपल्या धोरणात्मक संबंधांमध्ये संतुलन राखले. इस्त्राईल भारताला एक प्रमुख संरक्षण पुरवठादार म्हणून उदयास आला आहे, तर इराणकडून कच्चे तेल भारताच्या गरजा पूर्ण करते.

जगाची राजकीय परिस्थिती समजून घेणे महत्त्वाचे आपले म्हणणे पुढे नेत जयशंकर म्हणतात, आजच्या काळात जगातील राजकीय परिस्थिती समजून घेणे पूर्वीपेक्षा जास्त महत्त्वाचे आहे. यामुळे संधी आणि आव्हाने, दोन्ही येतात. आपण इथे व्यवसायाबद्दल बोलत असू, पण प्रत्यक्षात ही गोष्ट रोजगार निर्माण करण्याची आणि देशाला पुढे नेण्याची आहे. जेव्हा व्यवसाय यशस्वी होतात, मग ते देशात असो किंवा परदेशात, आपल्याकडे 'विकसित भारत'चे स्वप्न साकार करण्यासाठी आवश्यक असलेली ताकद, तंत्रज्ञान आणि संधी उपलब्ध होते.

गेल्या काही वर्षांत जागतिक अर्थव्यवस्थेने अनेक वादळे पाहिली आहेत. कोविडने पुरवठा साखळीवर परिणाम पाडला, युक्रेनच्या संकटामुळे अन्नपदार्थ, इंधन आणि खतांबद्दल चिंता वाढली. ऑक्टोबर 2023 पासून पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या गोंधळामुळे सागरी व्यापार ठप्प झाला असून, आशिया-युरोप व्यापारावर परिणाम झाला आहे. हवामान आणि राजकीय तणावाने डिजिटल आणि तंत्रज्ञान जगालाही हादरवून सोडले.

'हील इन इंडिया'ची वेळ टेक आणि सेवांनी परिपूर्ण भविष्यासाठी आपल्याला आपल्या तरुणांना जगासाठी योग्य बनवायचे आहे. अनेक देशांमध्ये कामाची गरज आणि लोकसंख्या यांच्यातील समन्वय बिघडला आहे. भारताने याला संधीत रूपांतरित केले आणि मोबिलिटी भागीदारीद्वारे आपली प्रतिभा जगासमोर नेली. आपल्या लोकांच्या सुरक्षित प्रवासासाठी सर्व मदतीची व्यवस्था करण्यात आली. आता पर्यटन हा केवळ प्रवासाचा विषय राहिला नसून ते अर्थव्यवस्थेला चालना देण्याचे साधन बनले आहे. 'हील इन इंडिया'ची वेळ आली आहे आणि ही आपच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे, असेही ते यावेळी म्हणाले.

टॅग्स :S. Jaishankarएस. जयशंकरIndiaभारतRussia Ukrainयुक्रेन आणि रशियाIranइराणIsraelइस्रायल