शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Russia-Ukraine crisis: लॉकडाऊनच्या हिरोला युक्रेनमधील भारतीयांची चिंता, केलंय महत्वाचं ट्विट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2022 17:36 IST

युक्रेनमधील परिस्थिती पाहता यथे अडकलेल्या भारतीय नागरिकांच्या सुटकेसाठी भारतानं प्रयत्न सुरू केले होते.

रशियाकडून आज युद्धाची घोषणा करण्यात आल्यानंतर युक्रेनकडून हवाई क्षेत्रात प्रवासी विमानांच्या उड्डाणाला बंदी घालण्यात आली आहे. रशियाकडून सातत्यानं लढाऊ विमानांच्या घिरट्या युक्रेनवर सुरू आहेत. तसंच काही ठिकाणी बॉम्बहल्ले देखील केले जात आहेत. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर युक्रेनकडून प्रवासी विमानांच्या उड्डाणाला बंदी घालण्यात आली आहे. रशिया आणि युक्रेनमधील या युद्धजन्य परिस्थितीत 20 हजार भारतीय नागरिक अडकले आहेत. या नागरिकांची काळीज भारतासह महाराष्ट्राला आहे. त्यासोबतच, लॉकडाऊनचा हिरो ठरलेल्या अभिनेता सोनू सूदनेही चिंता व्यक्त केली आहे. 

युक्रेनमधील परिस्थिती पाहता यथे अडकलेल्या भारतीय नागरिकांच्या सुटकेसाठी भारतानं प्रयत्न सुरू केले होते. मंगळवारी एअर इंडियाच एक विमान २५० हून अधिक जणांना घेऊन दिल्ली विमानतळावर दाखल झालं होतं. तसंच आज सकाळी देखील एक विमान युक्रेनची राजधानी कीव येथून दिल्ली विमानतळावर दाखल झालं. पण, आता विमानतळ बंद ठेवण्यात आल्याने भारतीय नागरिकांच्या सुटकेच्या मोहिमेलाही ब्रेक लागला आहे. त्यामुळे, नागरिकांच्या कुटुंबीयांसह, राज्य सरकार आणि भारत सरकारलाही नागरिकांची काळजी लागली आहे. त्यासाठी, सरकारचे प्रयत्नही सुरू आहेत. 

लॉकडाऊन काळात अडकलेल्या नागरिकांना इच्छितस्थळी, त्यांच्या स्वगृही पाठविण्याचे काम अभिनेता सोनू सूद याने केले होते. तेव्हापासून सोनू सूदचे सामाजिक कार्य वाढतच गेले आहे. आता, सोनूने युक्रेनमध्ये अडकलेल्या 18 हजार भारतीयांबद्दल चिंता व्यक्त केली आहे. युक्रेनमध्ये विद्यार्थी आणि कुटुंब मिळून 18 हजार भारतीय नागरिक फसले आहेत. या भारतीयांना परत आणण्यासाठी सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे, याची खात्री आहे. मी भारतीय परराष्ट्र खात्याला विनंती करतो की, पर्यायी मार्ग शोधावा. या सर्वांच्या सुरक्षेसाठी देवाला प्रार्थना... असे ट्विट सोनूने केले आहे.   

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्याही सूचना

युक्रेनमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्याही सुखरूप सुटकेसाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महत्वाच्या सूचना केल्या आहेत. "युक्रेनमधील युद्ध परिस्थिती पाहता महाराष्ट्रातील जे नागरिक विशेषत: विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत. त्यांची तिथे काय व्यवस्था आहे तसेच त्यांना परत सुखरुप घेऊन येण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाशी समन्वय साधण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना दिल्या आहेत", अशी माहिती राज्याच्या माहिती व जनसंपर्क महासंचलनालयाच्या ट्विटर हँडलवरुन देण्यात आली आहे. 

टॅग्स :Sonu Soodसोनू सूदRussia Ukrainयुक्रेन आणि रशियाcorona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत