शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

रशियात शिकायला गेला आणि सैन्यात भरती झाला, अखेर युक्रेनी सैन्यासमोर सरेंडर, गुजराती तरुणासोबत काय घडलं? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 17:33 IST

Russia Ukrain War: रशियन सैन्याकडून लढणाऱ्या साहिल मोहम्मद हुसेन या गुजराती तरुणाने सरेंडर केल्याची माहिती युक्रेनी सैन्याच्या ६३ व्या मेकॅनाइज बटालियनने दिली आहे. आता  या माहितीची पडताळणी सुरू असून, आपल्याकडे युक्रेनच्या अधिकाऱ्यांकडून कुठलीही अधिकृत माहिती आलेली नाही, असे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगिकले आहे.

रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या साडे तीन वर्षांपासून भीषण युद्ध  सुरू आहे. हजारो सैनिक आणि नागरिकांचा बळी गेल्यानंतर आणि मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाल्यानंतरही हे युद्ध थांबण्याची चिन्हे दिसत नाही आहे. दरम्यान, या युद्धामध्ये रशियन सैन्याकडून काही भारतीय तरुणही लढत असल्याच्या बातम्या अधूनमधून येत असतात. दरम्यान, रशियन सैन्याकडून लढणाऱ्या साहिल मोहम्मद हुसेन या गुजराती तरुणाने सरेंडर केल्याची माहिती युक्रेनी सैन्याच्या ६३ व्या मेकॅनाइज बटालियनने दिली आहे. आता  या माहितीची पडताळणी सुरू असून, आपल्याकडे युक्रेनच्या अधिकाऱ्यांकडून कुठलीही अधिकृत माहिती आलेली नाही, असे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगिकले आहे.

गुजराती तरुण असलेल्या साहिल मोहम्मद हुसेन याने युक्रेनी सैन्याच्या ज्या ६३ व्या मेकॅनाइज्ड ब्रिगेडसमोर आत्मसमर्पण केले. त्या ब्रिगेडने टेलिग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. १ मिनिट ४५ सेकंदांच्या या व्हिडीओमध्ये हुसेन हा लाल रंगाच्या टी-शर्टमध्ये दिसत आहे. तसेच तो रशियन भाषेत बोलत आहे.

युक्रेनी सैन्याच्या तावडीत सापडलेला साहिल मोहम्मद हुसेन हा मुळचा गुजरातमधील मोरबी येथील रहिवासी आहे. २२ वर्षांचा हुसेन हा शिक्षणासाठी रशियात गेला होता. तसेच त्याने रशियातील एका विद्यापीठामध्ये प्रवेशही मिळवला होता. मात्र तिथे तो एका ड्रग्सच्या केसमध्ये अडकला. त्यामध्ये दोषी आढळल्याने कोर्टाने त्यााल ७ वर्षांची शिक्षा सुनावली. मात्र तुरुंगवास टाळण्यासाठी त्याने वेगळा मार्ग निवडण्याचा निर्णय घेतला.

त्या दरम्यान, रशियन सैन्य शिक्षेच्या बदल्यात युद्धात सेवा देणाऱ्या लोकांचा शोध घेत होतं. साहिल मोहम्मद हुसेन यानेही शिक्षा टाळण्यासाठी रशियन सैन्याकडून लढण्याचा निर्णय घेतला. त्याने रशियन लष्करासोबत मोहिमेवर जाण्यासाठी एका करारावर सह्या केल्या. त्यानंतर त्याची तुरुंगातूनही सुटका झाली.

त्यानंतर आलेल्या अनुभवाबाबत साहिल मोहम्मद हुसेन याने सांगितले की, झालेल्या करारानुसार मला रशियन सैन्याकडून एक वर्ष लढायचे होते. करार संपल्यानंतर मला भारतात परत पाठवलं जाईल, असं सांगण्यात आलं होतं. मला केवळ १६ दिवसांचंच प्राथमिक प्रशिक्षण देण्यात आलं होतं. त्यानंतर १ ऑक्टोबर रोजी मला युद्धाच्या मोर्चावर पाठवण्यात आलं. तिथे गेल्यावर माझा कमांडरसोबत वाद झाला. त्यानंतर मी आत्मसमर्पण करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, हुसेन याने भीती आणि थकव्यामुळे आत्मसमर्पण केल्याचे युक्रेनी सैन्याने सांगितले. 

English
हिंदी सारांश
Web Title : Gujarati youth in Russia joins army, surrenders to Ukraine.

Web Summary : Sahil, a Gujarati student in Russia, joined the Russian army to avoid jail after a drug case. Following brief training, he was deployed to Ukraine, where he surrendered due to fear and fatigue, according to Ukrainian forces.
टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाwarयुद्धIndiaभारत