शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

भारताला अणुऊर्जा प्रकल्पासाठी रशिया करणार मदत; लोकेशन अन् डिझायनवर झाली चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2024 10:52 IST

Russia : पीएम मोदी यांच्या दोन दिवसीय रशिया दौऱ्यात व्यापार, ऊर्जा, हवामान आणि संशोधन यासह विविध क्षेत्रांमध्ये ९ करारांवर स्वाक्षरी केली.

Russia : पंतप्रधान नरेंद्र मोदी रशिया दौऱ्यावर आहेत. पीएम मोदी यांच्या दोन दिवसीय रशिया दौऱ्यात व्यापार, ऊर्जा, हवामान आणि संशोधन यासह विविध क्षेत्रांमध्ये ९ करारांवर स्वाक्षरी केली. यादरम्यान दोन्ही देशांमध्ये अनेक मोठ्या प्रकल्पांवर करार झाला, यामध्ये रशियाच्या सहकार्याने भारतात ६ नवीन अणुऊर्जा प्रकल्प उभारण्यावरही चर्चा झाली. रशियाची अणुऊर्जा एजन्सी  रोसाटॉम ही अणुऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी भारताला मदत करेल. रशियन एजन्सीने कुडनकुलम न्यूक्लियर पॉवर प्लांटच्या स्थापनेसाठी भारताला आधीच मदत केली आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची त्यांच्या दोन दिवसीय मॉस्को दौऱ्यादरम्यान क्रेमलिन या अधिकृत निवासस्थानी भेट घेतली. 

"भाजपाचा अयोध्येत पराभव झाल्याने मोदी आता जय श्रीराम म्हणत नाहीत, हिंदू धर्माला..."

दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली आणि नंतर द्विपक्षीय चर्चेत भाग घेतला. यामध्ये रशियन सरकारच्या मालकीच्या रोसाटॉमने भारताला सहा नवीन अणुऊर्जा प्रकल्प उभारण्यास मदत करण्याची ऑफर दिली. याशिवाय रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंडाने भारतासोबत फार्मा, जहाजबांधणी आणि शिक्षण क्षेत्रात करार केले. रशियाच्या दुसऱ्या सर्वात मोठ्या बँकेने दोन्ही देशांमधील व्यापार वाढत असताना पेमेंट प्रवाह सुलभ करण्याच्या प्रयत्नांवर भारताशी चर्चा केली. 

रोसाटॉम'ने एका निवेदनात म्हटले आहे की, भारतासोबत सहकार्याच्या नवीन क्षेत्रांवर चर्चा केली जात आहे - नवीन साइटवर रशियन डिझाइनचे आणखी सहा उच्च-शक्ती अणु युनिट्स बांधणे आणि काही लहान अणुऊर्जा प्रकल्प बांधण्यासाठी भारताला सहकार्य करणे. या वर्षी मे महिन्यात रोसाटॉमने भारताला फ्लोटिंग न्यूक्लियर पॉवर प्लांट बांधण्यासाठी आणि चालवण्याचे तंत्रज्ञान दिले होते.

जगात फक्त हे तंत्रज्ञान रशियाकडेच आहे

रशियाकडे पाण्यावर तरंगणारा अणुऊर्जा प्रकल्प आहे. असा प्रकल्प असणारा रशिया हा एकमेव ऊर्जा प्रकल्प आहे. अकादमिक लोमोनोसोव्ह जहाजावर हा अणुप्रकल्प तयार करण्यात आला आहे. रशियातील पेवेकमध्ये वीजपुरवठा या तरंगत्या अणुऊर्जा प्रकल्पातून केला जात आहे. पेवेक हे उत्तर आर्क्टिकमध्ये स्थित रशियाचे एक बंदर शहर आहे. रशियाशिवाय अन्य कोणत्याही देशाला अद्याप तरंगत्या अणुऊर्जा प्रकल्पाचे तंत्रज्ञान विकसित करता आलेले नाही. या प्रकारच्या प्लांटमधून अगदी दुर्गम भागात किंवा समुद्रात वसलेल्या बेटांनाही अखंडित वीजपुरवठा करता येतो.

रोसाटॉम आणि भारत उत्तर सागरी मार्गाची ट्रांझिट क्षमता विकसित करण्यावरही चर्चा करत आहेत. हा सागरी मार्ग रशियाच्या नॉर्वेच्या सीमेजवळील मुर्मन्स्कपासून पूर्वेकडे अलास्काजवळील बेरिंग सामुद्रधुनीपर्यंत पसरलेला आहे. हा सागरी मार्ग रशियन तेल, कोळसा आणि द्रव नैसर्गिक वायूच्या पुरवठ्यासाठी महत्त्वाचा आहे. रशियाला २०३० पर्यंत NSR द्वारे १५० मिलियन मेट्रिक टन वाहतूक करण्याचे टारगेट आहे, यातील या वर्षी ८० मिलियन मेट्रिक टनांनी वाढले आहे.

टॅग्स :russiaरशिया