Putin India Visit News: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतिन भारतात आले आहेत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुतिन यांचे एअरपोर्टवर जाऊन स्वागत केले. भारत आणि रशियाच्या २३ व्या वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी पुतिन भारत भेटीवर आले आहेत. अवघ्या जगाचे लक्ष पुतिन यांच्या भारतभेटीकडे लागले आहे. जगात घडत असलेल्या मोठ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पुतिन यांचा भारत दौरा अतिशय महत्त्वाचा मानला जात आहे. भारत आणि रशिया या दोन्ही देशांसाठी पुतिन आणि मोदी यांची भेट विशेष ठरणारी आहे.
पुतिन यांनी भारतात पाऊल ठेवताच त्यांना एक मोठे सरप्राइज मिळाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिल्याचे म्हटले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः पालम विमानतळावर जाऊन पुतिन यांचे विशेष स्वागत केले. रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन विमानातून उतरताच पंतप्रधान मोदींनी प्रेमाने हस्तांदोलन केले आणि नंतर त्यांना आलिंगन दिले. प्रोटोकॉल तोडून पंतप्रधान मोदी त्यांचे स्वागत करण्यासाठी विमानतळावर पोहोचले. पंतप्रधान मोदींच्या या कृतीने रशियाला आश्चर्यचकित केले. पंतप्रधान मोदी स्वतः उपस्थित राहणार आहेत, याबाबत कल्पना नसल्याचे रशियाच्या राष्ट्रापती कार्यालयाने म्हटले आहे.
रशियाच्या राष्ट्रपती भवनाने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, पंतप्रधान मोदी हे स्वतः राष्ट्रपती पुतिन यांच्या स्वागतासाठी विमानतळावर उपस्थित राहतील याची कल्पना नव्हती. याबाबत माहिती नव्हती. यानंतर, पंतप्रधान मोदी आणि पुतिन एकाच कारने पंतप्रधानांच्या निवासस्थानाकडे रवाना झाले. दोन्ही नेते एकाच टोयोटा एसयूव्हीमध्ये एकत्र प्रवास करताना दिसले.
दरम्यान, पुतिन हे २३ व्या भारत-रशिया शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी भारतात आले आहेत. ही दोन्ही देशांमधील वार्षिक बैठक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून ते भारत दौऱ्यावर येत आहेत. या भेटीदरम्यान दोन्ही नेते तेलापासून ते S-400 क्षेपणास्त्र प्रणाली खरेदी आणि मुक्त व्यापार करार (FTA) यासारख्या मुद्द्यांवर चर्चा करतील अशी अपेक्षा आहे. रशिया-युक्रेन संघर्ष सुरू असताना राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे.
Web Summary : President Putin's India visit for the 23rd annual summit began with a surprise. PM Modi personally welcomed him at the airport, exceeding protocol and astonishing the Russian delegation. Discussions on oil, S-400 missiles, and trade are expected during Putin's visit amidst the Russia-Ukraine conflict.
Web Summary : राष्ट्रपति पुतिन की भारत यात्रा 23वें वार्षिक शिखर सम्मेलन के लिए अप्रत्याशित रूप से शुरू हुई। पीएम मोदी ने व्यक्तिगत रूप से हवाई अड्डे पर उनका स्वागत किया, प्रोटोकॉल तोड़ा और रूसी प्रतिनिधिमंडल को चकित कर दिया। रूस-यूक्रेन संघर्ष के बीच पुतिन की यात्रा के दौरान तेल, एस-400 मिसाइलों और व्यापार पर चर्चा होने की उम्मीद है।