भारताची हवाई शक्ती आणखी मजबूत करण्यासाठी रशियाने एक महत्त्वाचा प्रस्ताव दिला आहे. रशियानेभारताला त्यांच्या पाचव्या पिढीतील Su-57 स्टेल्थ लढाऊ विमानांचा पुरवठा आणि स्थानिक उत्पादन करण्याची ऑफर दिली आहे. रशिया २०२६ पर्यंत भारताला पाचही S-400 ट्रायम्फ हवाई संरक्षण प्रणालींचे वितरण पूर्ण करेल. दरम्यान, अतिरिक्त S-400 प्रणालींबाबत दोन्ही देशांमध्ये वाटाघाटी सुरू आहेत.
रशियाच्या फेडरल सर्व्हिस फॉर मिलिटरी-टेक्निकल कोऑपरेशन (FSMTC) चे प्रमुख दिमित्री शुगायेव यांनी सांगितले आहे की भारत आधीच S-400 प्रणाली वापरतो आणि या क्षेत्रातील सहकार्य आणखी वाढण्याची शक्यता आहे. याचा अर्थ असा की नवीन करारावर सहमती होऊ शकते.
ट्रम्प यांना आणखी एक धक्का! फ्रान्स पॅलेस्टिनी राष्ट्राला मान्यता देणार, मॅक्रॉन यांची मोठी घोषणा
Su-57 चे फिचर काय आहेत?
Su-57 हे रशियाचे पाचव्या पिढीतील स्टेल्थ मल्टी-रोल फायटर जेट आहे, हे भविष्यातील हवाई लढाईसाठी डिझाइन केलेले आहे. ते शत्रूच्या रडारला सापडत नाही. ते सुपरसॉनिक वेगाने उड्डाण करू शकते आणि लांब पल्ल्याचे हल्ले करण्यास सक्षम आहे. ते अत्याधुनिक एव्हियोनिक्सने सुसज्ज आहे आणि बहुआयामी लढाऊ क्षमता प्रदान करते. यामुळे भारतीय हवाई दलाला एक नवीन ताकद मिळेल आणि चीनसारख्या देशांच्या वाढत्या हवाई शक्तीचा सामना करणे सोपे होईल.
भारतासाठी याचा अर्थ काय?
जर भारत Su-57 प्रकल्पात सामील झाला तर त्याला केवळ अत्याधुनिक स्टेल्थ लढाऊ विमाने मिळणार नाहीत तर स्थानिक उत्पादनामुळे मेक इन इंडियाला एक नवीन प्रेरणा मिळेल. जर अतिरिक्त S-400 करार अंतिम झाला तर भारताची हवाई संरक्षण प्रणाली अधिक मजबूत होईल. रशियाकडून मिळालेली ही ऑफर भारताच्या संरक्षण तयारीला पुढील स्तरावर नेण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल ठरू शकते. यामुळे हवाई दलाला शत्रूच्या हवाई हल्ल्यांपासून संरक्षण करण्यास मदत होईल.