शहरं
Join us  
Trending Stories
1
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
2
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
4
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
5
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
6
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
7
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
8
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
9
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
10
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
11
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
12
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
13
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
14
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
15
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
16
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
17
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
18
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
19
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
20
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...

रशियाचे रडार बनणार भारताची ढाल; 8000 किमी अंतरावरील हालचालींवर ठेवणार बारीक लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 21:05 IST

Russia Advance Radar System : रशियाच्या रडारमुळे पाकिस्तान-चीनसह आखाती आणि आफ्रिकन देशांवर लक्ष ठेवता येणार.

India-Russia Relations :भारत आणि रशियाची मैत्री सर्वश्रुत आहे. गेली अनेक दशके भारत-रशियामध्ये व्यापार सुरू आहे. दरम्यान, या मैत्रीने आता संरक्षण क्षेत्रात एक नवा टप्पा गाठला आहे. ब्रह्मोस मिसाइल प्रोजेक्ट, S-400 मिसाइल डिफेन्स सिस्टीमनंतर आता भारताने आता रशियासोबत 4 अब्ज डॉलर्सचा नवीन करार केला आहे. या करारांतर्गत रशियाचे अत्याधुनिक व्होरोनेझ रडार भारतात तैनात केले जाणार आहेत. या अत्याधुनिक रडार यंत्रणेची रेंज तब्बल 8,000 किलोमीटर आहे. 

कर्नाटक राज्यात तैनात करण्यात येणार हे अत्याधुनिक रडार सिस्टीम 8 हजार किलोमीटर दूरवरील हल्ल्यांना परतून लावण्यास सक्षम असेल. हे रडार कर्नाटक राज्यातील चित्रदुर्ग जिल्ह्यात तैनात केली जाईल. हे रडार भारतासाठी ढालीप्रमाणे काम करेल. या रडारमुळे भारत फक्त पाकिस्तान आणि चीनच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवू शकणार नाही, तर आखाती आणि आफ्रिकन देशांच्या हवाई क्षेत्रावरही बारीक नजर ठेवता येणार आहे.

अमेरिकेचा दबाव झुगारुन रशियासोबत करारअमेरिका आणि पाश्चात्य देशांच्या दबावानंतरही भारताने रशियासोबत 4 अब्ज डॉलर्सचा हा करार केला आहे. हे पाऊल भारताच्या स्वतंत्र परराष्ट्र धोरणाचे आणि धोरणात्मक स्वायत्ततेचे उदाहरण आहे.

व्होरोनेझ रडार प्रणालीचे वैशिष्ट्य 

8 हजार किमीचा हा रडार S-400 संरक्षण प्रणालीसाठी ओळखल्या जाणाऱ्या रशियाच्या अल्माझ अँड टेक कंपनीने बनवला आहे. हे रडार स्टेल्थ फायटर जेट्स, बॅलेस्टिक मिसाईल आणि इतर हवाई धोके सहज शोधू शकते. या 8 हजार किमी श्रेणीचा भारताला अभूतपूर्व फायदा मिळतो. याद्वारे चीन आणि पाकिस्तानच्या हवाई तळांवर कोणती विमाने उडत आहेत आणि कोणती लँडिंग करत आहेत, याची अचूक आणि वास्तविक माहिती भारताला मिळू शकेल.

भारताच्या आत्मनिर्भरतेची प्रतिमा दिसेलचीनने नुकतेच आपले पाचव्या पिढीतील स्टेल्थ लढाऊ विमान जगासमोर आणले आहे. स्टेल्थ तंत्रज्ञानामुळे सामान्य रडार ही लढाऊ विमाने शोधू शकत नाही. पण व्होरोनेज त्याच्या विशेष आणि प्रगत तंत्रज्ञानाद्वारे ते सहजपणे शोधू शकते. रशियाच्या व्होरोनेझ रडारच्या तैनातीमुळे भारताची आत्मनिर्भरता देखील दिसून येईल. या प्रकल्पाचे 60 टक्क्यांहून अधिक काम फक्त भारतातच केले जाईल. DRDO यात प्रमुख भूमिका बजावणार आहे.

टॅग्स :russiaरशियाIndiaभारतNarendra Modiनरेंद्र मोदीVladimir Putinव्लादिमीर पुतिन