शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
2
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
6
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
7
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
8
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
9
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
10
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
11
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
12
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
13
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
14
अकोला महापालिका: भाजप-शिंदेंच्या शिवसेनेचं युतीबाबत निर्णय कधी? ठाकरेंची शिवसेना-मनसेची बोलणी सुरू
15
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
16
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
17
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
18
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
19
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
20
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
Daily Top 2Weekly Top 5

खासदारांच्या स्वागतासाठी दिल्लीत धावपळ सुरू, लोकसभा सचिवालयाची जोरदार तयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2024 06:58 IST

Lok Sabha Election 2024 :मतदान झाल्यानंतर निवडणूक आयोग सर्वात प्रथम निवडून आलेल्या उमेदवारांची यादी जाहीर करेल.

नवी दिल्ली : १८व्या लोकसभेत कोण कोण सदस्य येणार याचा निर्णय मंगळवारी (दि. ४) सायंकाळपर्यंत होणार आहे. नवीन खासदारांच्या स्वागतासाठी लोकसभा सचिवालयही जोरात तयारी करत आहे. यासाठी अनेक व्यवस्था तयार करण्यात आल्या आहेत. अधिकाऱ्यांची पूर्ण एक टीम या कामामध्ये गुंतली आहे. दिल्लीतील सरकारी गेस्ट हाउस आणि पश्चिम कोर्ट हॉस्टेल परिसरात नव्या खासदारांची राहण्यासाठी सोय करण्यात येणार आहे.मतदान झाल्यानंतर निवडणूक आयोग सर्वात प्रथम निवडून आलेल्या उमेदवारांची यादी जाहीर करेल. यानंतर निवडून आलेले  खासदार दिल्लीत येण्यास सुरुवात करतील, असे सांगण्यात आले. 

खासदारांना दिल्लीत आल्यावर काय मिळणार?प्रवासाच्या सुरुवातीला लोकसभा सचिवालयाचे अधिकारी त्यांच्याशी संपर्क साधतील आणि दिल्लीत त्यांचे स्वागत करतील. यासाठी विमानतळावर विशेष स्वागत कक्ष बनविण्यात आले आहेत. स्वागत केल्यानंतर खासदारांना ॲनेक्सी इमारतीमध्ये आणले जाईल. यानंतर त्यांना फोन कनेक्शन, नवीन बँक खाते, संसद भवनात प्रवेशासाठी लागणारे स्मार्ट ॲक्सेस कार्ड, वाहनांसाठी फास्टॅग स्टिकर आणि पासपोर्टसह अनेक महत्त्वाचे कागदपत्रे उपलब्ध करून दिली जातील.

पेपरलेस प्रक्रिया राबवणार, खासदारांचा वेळ वाचणारयावेळी लोकसभा सचिवालयातील नवीन खासदारांच्या नोंदणीची प्रक्रिया पूर्णपणे पेपरलेस करण्यात आली आहे. नवनिर्वाचित सदस्यांची नोंदणी प्रक्रिया ऑनलाइन एकात्मिक सॉफ्टवेअर ॲप्लिकेशनद्वारे पूर्ण केली जाईल.ही प्रक्रिया ५ जून ते १४ जूनपर्यंत सुरू राहणार आहे. या कालावधीत शनिवार आणि रविवारीही नोंदणी सुरू राहील. खासदारांना फॉर्मवर स्वाक्षरी करण्याची आवश्यकता लागणार नाही.यामुळे खासदारांचा बराच वेळ वाचणार आहे. हे ॲप्लिकेशन केवळ खासदाराचा बायो-प्रोफाइल डेटाच कॅप्चर करत नाही, तर फेशियल आणि बायोमेट्रिक कॅप्चरिंगच्या आधारावर संसद ओळखपत्र देईल. याचवेळी खासदाराच्या जोडीदारालाही सीजीएचएस कार्ड देण्यात येईल.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Parliamentसंसदlok sabhaलोकसभा