गॅस सिलेंडर अनुदानाचे पहिले पाढे पंचावन्न बॅकेत खाते काढण्यासाठी पुन्हा होणार धावपळ
By Admin | Updated: December 12, 2014 23:49 IST2014-12-12T23:49:18+5:302014-12-12T23:49:18+5:30
घरघुती वापराच्या गॅस सिलेंडरचे अनुदान थेट बँकेत ही योजना जानेवारी २०१५ पासून नांदेड जिल्ात सुरु होत आहे़ प्रायोगिक स्वरुपात राज्यातील काही जिल्ात १५ नोव्हेंबर २०१४ पासून ही योजना लागू झाली आहे़ परंतु आता जानेवारीपासून सर्व राज्यातच या योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे़ त्यामुळे पुन्हा एकदा गॅस ग्राहकांना बँक खाते व आधार कार्डासाठी खेटे मारावे लागणार आहेत़

गॅस सिलेंडर अनुदानाचे पहिले पाढे पंचावन्न बॅकेत खाते काढण्यासाठी पुन्हा होणार धावपळ
घ घुती वापराच्या गॅस सिलेंडरचे अनुदान थेट बँकेत ही योजना जानेवारी २०१५ पासून नांदेड जिल्ात सुरु होत आहे़ प्रायोगिक स्वरुपात राज्यातील काही जिल्ात १५ नोव्हेंबर २०१४ पासून ही योजना लागू झाली आहे़ परंतु आता जानेवारीपासून सर्व राज्यातच या योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे़ त्यामुळे पुन्हा एकदा गॅस ग्राहकांना बँक खाते व आधार कार्डासाठी खेटे मारावे लागणार आहेत़यापूर्वी आघाडी शासनाच्या काळात गॅस सिलेंडरचे अनुदान बँक खात्यात जमा करण्याची योजना सुरु करण्यात आली होती़ परंतु त्यावेळी भाजपासह सर्वच विरोधी पक्षांनी या योजनेवर टिका केली होती़ परंतु आता युती शासनानेही याच योजनेची रि ओढली आहे़ या योजनेअंतर्गत घरघुती एलपीजी गॅस धारकांना विना अनुदानित सिलेंडर खरेदी करावा लागणार आहे़ ज्याचे अनुदान थेट ग्राहकांच्या बँक खात्यात जमा होणार आहे़ पेट्रोलियम मंत्रालयाने घरगुती वापराच्या एलपीजी सिलेंडरसाठी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर ऑफ एलपीजी सबसिडी ही योजना सुरु केली आहे़ ज्या गॅस ग्राहकांकडे आधार कार्ड आहे़ त्यांनी आधार क्रमांक राष्ट्रीयकृत किंवा ऑनलाईन बँकेला व गॅस वितरकांना फॉर्म क्रमांक १ व १ भरुन सोबत आधार कार्ड व पासबुक ची दोन-दोन प्रत द्यावयाची आहे़ ज्या गॅस ग्राहकांकडे आधार कार्ड नाही त्यांनी बँक खात्याची माहिती फॉर्म क्रमांक ४ मध्ये भरुन गॅस वितरकाला द्यावी किंवा आपल्या एलपीजी आयडी बँकेत जावून फॉर्म क्रमांक ३ भरुन जमा करणे़ संलग्नीकरणासाठी लागणारे चार प्रकारचे अर्ज निशुल्क आपल्या गॅस एजन्सीवर उपलब्ध आहेत़ आधार कार्ड व बँक खाते पास बुकचे दोन-दोन प्रत बँकेत व गॅस वितरकाकडे त्वरित देवून संलग्नीकरणाची प्रक्रिया पूर्ण करुन घ्यावयाची आहे़ यापूर्वी ज्यांनी या योजनेत सहभाग घेतला व त्यांच्या बँक खात्यात गॅस सिलेंडरचे अनुदान जमा झाले अशांना काही करण्याची गरज नाही़ मात्र ज्यांनी सहभाग घेतला परंतु सबसिडी जमा झाली नाही़ त्यांनी संलग्नीकरण स्थिती बँकेत व तेल कंपनीच्या टोल फ्री क्रमांकावर १८००२३३३५५५ वर संपर्क साधावा असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा पुरवठा अधिकार्यांनी केले आहे़परंतु या योजनेमुळे पुन्हा एकदा बँकेत खाते व आधार कार्डासाठी झुंबड उडण्याची शक्यता आहे़