शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
2
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
3
भाजपा उमेदवार राम सातपुतेंची सोशल मीडियावर बदनामी; कॉंग्रेस कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल
4
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
5
जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?
6
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
7
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
8
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
9
Adani Ports Share Price : ₹१७०० पार जाऊ शकतो Adani समूहाचा 'हा' शेअर; वर्षभरात पैसे केलेत दुप्पट, जाणून घ्या
10
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाण्यात नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार
11
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
12
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
13
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करा 'हे' पाच खास उपाय, वास्तूला कधीही होणार नाही अपाय!
14
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
15
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
16
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
17
हाताला दुखापत अन्...; अंकिता लोखंडेला काय झालं? हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत म्हणते...
18
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
19
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
20
माझ्याशी लग्न करणार?; 'त्याने' २४ हून अधिक महिलांना फसवलं; अखेर मुंबई पोलिसांनी बिंग फोडलं

भूतानच्या चिमुकल्या राजकुमारासोबत रमल्या सुषमा स्वराज

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2017 11:41 PM

नवी दिल्ली- भारताचा शेजारील देश असलेल्या भूतानचे राजा जिग्मे खेसर नामग्येल वांगचुक चार दिवसांच्या भारताच्या दौ-यावर आहेत.

नवी दिल्ली- भारताचा शेजारील देश असलेल्या भूतानचे राजा जिग्मे खेसर नामग्येल वांगचुक चार दिवसांच्या भारताच्या दौ-यावर आहेत. या दौ-यात त्यांच्यासोबत त्यांची पत्नी जेत्सुन पेमा वांगचुक व राजकुमार जिग्मे नामग्येल वांगचुकही उपस्थित आहेत. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज या विमानतळावर त्यांच्या स्वागतासाठी गेल्या होत्या. यावेळी राजकुमार जिग्मे नामग्येल वांगचुक उपस्थित सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू होता. सुषमा स्वराजही या चिमुकल्या राजकुमारासोबत विमानतळावरून बाहेर येताना काहीशा रमल्या. नवी दिल्लीतल्या विमानतळावर हा राज परिवार उतरल्यानंतर परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी त्यांचं विमानतळावर स्वागत केलंय. भूतानचे राजे बुधवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेण्यासाठी राष्ट्रपती भवनातही जाणार आहेत. तसेच त्यानंतर भूतानच्या राजा-राणीचा हा शाही जोडा पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेण्यासाठी दिल्लीतल्या लोककल्याण मार्गावर असलेल्या मोदींच्या बंगल्यावरही जाणार आहे. या दौ-यात भूतानचा राजा केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली, संरक्षण मंत्री निर्मला सीतारमन आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंचीही भेट घेणार आहेत.भौगोलिक दृष्ट्या भूतान हा भारतासाठी खूप महत्त्वाचा शेजारील देश आहे. हल्लीच डोकलामच्या रस्ते निर्माणावरून भारत व चीनमध्ये वाद झाला होता. त्यावेळी भूताननं भारताची साथ दिली होती. मे 2014ला पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदींनी भूतानपासूनही स्वतःच्या दौ-याची सुरुवात केली होती. भूतानच्या राणीचे भारताशी जुने ऋणानुबंध आहेत. त्यांनी स्वतःचं शालेय शिक्षण हिमाचल प्रदेशमधल्या सनोवर येथील एका प्रख्यात शाळेत पूर्ण केलं आहे.  

टॅग्स :Sushma Swarajसुषमा स्वराज