शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
2
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
3
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
4
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
5
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
6
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
7
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
8
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
9
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
10
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
11
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
12
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
13
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
14
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
15
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
16
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
17
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
18
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
19
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का
20
'सोन्याची आहे की चंद्रावरून आणलीत?'; प्राडाच्या सेफ्टी पिनचा सोशल मीडियावर धुमाकूळ! किंमत किती?

पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशांसाठी ‘बॉण्ड’ची सक्ती करणे वैध, सुप्रीम कोर्टाचा निकाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2019 00:24 IST

आंध्र प्रदेश, गोवा, गुजरात, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र, ओडिशा, राजस्थान, तमिळनाडू, तेलंगणा, प. बंगाल आदी राज्यांतील ‘बॉण्ड’च्या सक्तीवर या निकालाने शिक्कामोर्तब झाले आहे.

नवी दिल्ली : वैद्यकीय शिक्षणाच्या पदव्युत्तर आणि ‘सुपर स्पेशॅलिटी’ अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना काही काळ सरकारी नोकरी करण्याचा ‘बॉण्ड’ देण्याची सक्ती करणारे विविध राज्यांचे नियम सर्वोच्च न्यायालयाने वैध ठरविले आहेत. मात्र, ‘बॉण्ड’ची रक्कम व सेवेचा काळ यात तफावत असल्याने केंद्र सरकार व मेडिकल कौन्सिलने समान नियम करण्याचा विचार करावा, असे न्यायालयाने म्हटले आहे.आंध्र प्रदेश, गोवा, गुजरात, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र, ओडिशा, राजस्थान, तमिळनाडू, तेलंगणा, प. बंगाल आदी राज्यांतील ‘बॉण्ड’च्या सक्तीवर या निकालाने शिक्कामोर्तब झाले आहे. या राज्यांत विद्यार्थ्यांनी ‘बॉण्ड’ लिहून देऊन पदव्युत्तर व ‘सुपरस्पेशॅलिटी’ अभ्यासक्रमांना प्रवेश घेतले. मात्र, अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर ‘बॉण्ड’ची पूर्तता न करता त्यांनी बॉण्डला आव्हान दिले. त्या याचिका फेटाळल्या गेल्यावर सर्वोच्च न्यायालयात अपिले केली गेली. न्या. एल. नागेश्वर राव व न्या. हेमंत गुप्ता यांनी या अपिलांवर एकत्रित सुनावणी घेऊन हा निकाल दिला. दोन अपिले महाराष्ट्रातील होती. एक अपील राज्य सरकारच्या वैद्यकीय महाविद्यालयांतून ‘सुपर स्पेशॅलिटी’चा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्यांचे, तर दुसरे सशस्त्र सैन्यदलांच्या पुण्यातील वैद्यकीय महाविद्यालयातून पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केलेल्यांचे होते. सरकारी महाविद्यालयांत एक, तर सैन्यदलांच्या महाविद्यालयात पाच वर्षे लष्करात सेवा देण्याचा ‘बॉण्ड’ घेतला जातो. ‘बॉण्ड’चे पालन न केल्यास विद्यार्थ्यांना दंड भरावा लागतो.न्यायालयाने म्हटले की, बॉण्डच्या सक्तीने याचिकाकर्त्यांच्या मूलभूत हक्काची पायमल्ली झालेली नाही. दुर्बल घटकातील लोकांना दर्जेदार वैद्यकीय सेवा मिळण्याच्या हक्काची जपणूक करण्याच्या हेतूने हे नियम केले आहेत. सरकार अत्यल्प फी आकारून डॉक्टरांच्या उच्चशिक्षणाची सोय करते. त्या बदल्यात डॉक्टरांकडून समाजासाठी काही काळ सेवा घेणे अवास्तव नाही.हक्कावर गदा येते; हा मुद्दा गैरलागून्यायालयाने असेही म्हटले की, ‘बॉण्ड’ची सक्ती मान्य नव्हती, तर प्रवेश न घेण्याचा पर्याय विद्यार्थ्यांना होता; परंतु ‘बॉण्ड’वर प्रवेश घ्यायचा व पूर्तता करण्याची वेळ आल्यास त्यास आक्षेप घ्यायचा, हे अयोग्य आहे. शिवाय या सक्तीने या डॉक्टरांच्या खासगी व्यवसायाच्या हक्कावर गदा येते, हा मुद्दाही गैरलागू आहे. कारण खासगी व्यवसायाचा हक्क शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मिळतो. विद्यार्थी असताना नाही.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय