तृणमूल नेत्यांविरुद्ध पुरवणी आरोपपत्र
By Admin | Updated: February 18, 2015 23:54 IST2015-02-18T23:54:12+5:302015-02-18T23:54:12+5:30
कोलकाता : कोट्यवधी रुपयांच्या शारदा चिटफंड घोटाळ्याबाबत प. बंगालचे मंत्री मदन मित्रा, तृणमूल काँग्रेसचे माजी खासदार श्रींजॉय बोस, शारदा समूहाच्या प्रमुखांचे सहायक नरेश बलोडिया तसेच निलंबित खासदार कुणाला घोष यांच्याविरुद्ध सीबीआयने बुधवारी पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे.

तृणमूल नेत्यांविरुद्ध पुरवणी आरोपपत्र
क लकाता : कोट्यवधी रुपयांच्या शारदा चिटफंड घोटाळ्याबाबत प. बंगालचे मंत्री मदन मित्रा, तृणमूल काँग्रेसचे माजी खासदार श्रींजॉय बोस, शारदा समूहाच्या प्रमुखांचे सहायक नरेश बलोडिया तसेच निलंबित खासदार कुणाला घोष यांच्याविरुद्ध सीबीआयने बुधवारी पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे.या प्रकरणी सीबीआयच्या विशेष शाखेने अलीपूर येथे अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी हराधन मुखर्जी यांच्या न्यायालयात सादर केलेल्या पुरवणी आरोपपत्रात स्ट्रटेजी मीडिया, संगबाद प्रतिदिन टीव्ही प्रा. लि. बंगाल मीडिया या तीन कंपन्यांचाही समावेश केल्याचे सीबीआयच्या प्रवक्त्याने सांगितले.बोस यांना उच्च न्यायालयाने सशर्त जामीन दिला असला तरी उर्वरित तिघे अजूनही न्यायालयीन कोठडीत ओहत. हे तिसरे पुरवणी आरोपपत्र असून पहिले आरोपपत्र २२ ऑक्टोबर २०१४ रोजी शहर सत्र न्यायालयात तर दुसरे अलीपूर येथील न्यायालयात १७ नोव्हेंबर १४ रोजी दाखल करण्यात आले.